अर्ध्या एकरावरील अनेक यशस्वी प्रयोगामुळे ५ एकरावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. नारायण शिवराम मोरबाळे,
मु. पो. सावर्डे बु॥, ता. कागल, जि. कोल्हापूर
मोबा.९०४९५०८०९६


मी नारायण मोरबाळे गेल्या वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. माझी एकूण पाच एकर शेती आहे. त्यामध्ये सुरुवातीला २० गुंठे क्षेत्रावरती या टेक्नॉंलॉजीचा वापर कोल्हापूर प्रतिनिधी श्री. केदार मोरे यांच्या सल्ल्यानुसार करण्यात आला.

अर्धा एकर शेती सुरवातीला नांगरून घेतली. नंतर उभ्या आडव्या दोन कुळवाच्या पाळ्या देण्यात आल्या. नंतर तीन फूट रुंदीची सरी सोडली. जूनमध्ये बोधावरती दोन सरी आड मिरची लावली व सरीवरती एका बाजुला सोयाबीन व दुसऱ्या बाजुला भूईमूगा टोकाला. सर्वसाधारण आठ दिवसांनी बी उगवून आले.

उगवणीनंतर २१ दिवसाच्या अंतरानी सर्व पिकावरती सप्तामृत फवारणी केली. मिरचीसाठी आळवणी करण्यात आली. आळवणीसाठी जर्मिनेटर ७५ मिली + थ्राईवर ७५ मिली + बाविस्टीन ३० ग्रॅम + १५ लि. पाणी या प्रमाणे मिरचीसाठी आळवणी केली. दुसरी फवारणी लागवडीनंतर ६० दिवसांनी व तिसरी फवारणी ८० दिवसांनी सप्तामृताची घेतली. मध्ये पावसाने ताण दिल्याने १० दिवसांच्या अंतराने दोन पाण्याच्या पाळ्या दिल्या.

अर्धा एकरासाठी एक पोते १८:४६:०० आणि कल्पतरू दोन पोती एकत्र मिसळून पीक पेरणीवेळी देण्यात आले. उत्पादनाच्या बाबतीत तर एवढे उत्पादन यापुर्वी कधीच मिळाले नाही. अर्धा एकरमध्ये सोयाबीन ८ क्विंटल, भुईमूग ४ क्विंटल, मिरची १०,००० रुपयाची मिळाली. यापुर्वी आम्ही एकाच पीक घेत होतो. त्याचेही अगदी कमी उत्पादन मिळत होते. पण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर व केदार मोरे यांच्या मार्गदर्शनामुळे मिश्रपीक पद्धत व त्याचे भरधोस उत्पादन यामुळे या टेक्नॉंलॉजीचा संपूर्ण पाच एकर क्षेत्रासाठी वापर करत आहे व इतर माझ्या शेतकरी मित्रांना देखील प्रेरीत करीत आहे.