द्राक्षबाग न फुटल्याने परत रिकट घेऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थंडीतही संपुर्ण बाग फुटली

श्री. हरिदास मारुती आखाडे,
मु. पो. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे.
मोबा. ९९२२३६२७९९


आम्ही १३ नोव्हेंबर २०१२ रोजी ऑक्टोबर छाटणी केली होती. मात्र २४ ते २५ दिवस झाले तरी २५% च बाग फुटली. यासाठी सुक्ष्म अन्नद्रव्ये १५० किलो वापरले होते. पेस्ट केली होती.

बाग न फुटल्याने द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी (पुणे) येथे काडी तपासणीसाठी गेलो. काडी तपासणीनंतर काडीमध्ये घड आहेत. तरी तुम्ही रिकट घेऊन डबल पेस्ट करा. काडी पुन्हा फुटतेकी नाही याची शंका होती. दरम्यान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे नाशिक जिल्हा प्रमुख श्री. सय्यद साहेबांच्या संपर्कात होतो. त्यांना द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी येथील रिपोर्ट सांगितला, तेव्हा सय्यद साहेबांनी सांगितले काडीमध्ये घड आहेत तर रिकट घेण्यास काहीच हरकत नाही. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने काडी १००% फुटेल. त्यानंतर ६ डिसेंबर २०१२ रोजी रिकट घेतला. या अवस्थेत थंडीचा कालावधी होता. तरी पर्याय नसल्याने रिकट घेतला. रिकट घेतल्यावर पेस्टमध्ये ५० मिली जर्मिनेटर आणि प्रिझम १० मिली प्रति लिटरसाठी वापरले.

त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेत जशी बाग फुटते तशी बाग ९ व्या दिवशी फुटली. आज (१४ डिसेंबर २०१२) ९ व्या दिवशी पोंगा अवस्थेत बाग आहे. १०० % डोळे फुटले आहेत.

आता पोंगा अवस्थेत १०० % घड बाहेर येऊन सशक्त होण्यासाठी जर्मिनेटर १ लि. थ्राईवर ५०० मिली, क्रॉंपशाईनर ५०० मिली, हार्मोनी २५० मिली स्प्रेसाठी घेऊन जात आहे. या प्रतिकूल परिस्थितीत आम्हाला सय्यद साहेबांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने हे तंत्रज्ञान व्यवस्थित वापरून द्राक्ष बाग सुस्थितीत आला. आता पुढील वापरदेखील वेळापत्रकाप्रमाणे करत आहे.