हार्मोनी डावण्या थांबून घड सुधारले

श्री. श्रीकांत माळी,
मु. पो. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली


द्राक्ष बागेचे क्षेत्र : तीन एकर, जात : सोनाका, रोग : डाऊनी

मणी सेटींगच्या वेळी द्राक्ष घडावर जवळपास ५० ते ६० % डावण्या रोग दिसत होता. त्यातच वातावरण खराब झाले. बाजारातील औषधे मारूनसुद्धा डावणी रोग आटोक्यात आला नाही. बाग सोडून देण्याची वेळ आली होती. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी यांनी माझ्याशी चर्चा करून हार्मोनीचा सल्ला दिला. मी शेवटचा पर्याय म्हणून हार्मोनीचा स्प्रे २० मिली + १० लि. पाणी या प्रमाणात पहिला स्प्रे घेतला. त्याने २ ते ३ दिवसामध्ये घडांवरील डावण्या रोग तांबूस पडला. नंतर दुसरा हार्मोनीच्या स्प्रे हा ५ ते ६ दिवसांनी घेतला. त्याने डावण्या रोगांचे ६० ते ७० % घड हे जगलेले दिसले व त्यांची काही दिवसांनी त्या घडांची वाढ झालेली दिसली.