दुसऱ्या बहारातच १६०० झाडामध्ये ३२ टन एक्सपोर्ट क्वॉलीटीचे डाळींब

श्री. शिवाजी दोधा देसले,
मु. पो. गोराणे, ता. सटाणा, जि. नाशिक.
मो. ९७६७५ ७५७८४आम्ही शेंद्र्या डाळींबामध्ये चार एकरमध्ये ३२ टन माल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा आधार घेऊन साडेपाच महिन्यातच सर्व माल एकसारखा तयार झाला. (संदर्भ कव्हरवरील फोटो) आम्ही सुरवातीला पानगळ करून काडीवरती जर्मिनेटर फवारले, त्यामुळे बाग एकसारखी फुटली. प्रत्येक काडीचा डोळा सारखा फुटताना दिसला व जाड खोडसुद्धा कोम उमळताना दिसले. तेथुन सुरवात झाल्यावर भवरी तयार झाल्यावर प्रिझम + थ्राईवर + फवारल्यावर पत्ती जाड व काळीभोर तयार झाली. फुल टपोरे व जाड मादी फुल निघतांना दिसले व नंतर फुल निघत असताना थ्राईवर + क्रॉंपशाईनर + न्युट्राटोन फवारले असताना फुल गळ न होता लगेच सेटींग सुरू झाली आणि प्लॉट अवघ्या ५० दिवसात पुर्ण सेटींग होऊन फुल लोड झाला. फळे पेरूच्या आकाराची असताना न्युट्राटोन, राईपनर फवारल्याने फुगवण मिळाली. सालीस आकर्षक चमक आली. नियमित डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कुज व करप्याचे डाग पडले नाही. निरोगी फळ पहावयास मिळाले. नंतर इतर औषध, पेस्टीसाईड वापरून त्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येक स्प्रे मध्ये वापरत गेल्यामुळे कीटकनाशक व बुरशीनाशक खुपच कमी प्रमाणात लागले. दुसरी गोष्ट तेल्याचे वातावरण असतानासुद्धा तेल्या आमच्या बागेत कुठेच दिसला नाही.

बागेस पाणी लावलेली तारीख १४ फेब्रुवारी असून माल २० जुलै रोजी तयार होऊन ६१ रू. किलोने सर्व माल व्यापाऱ्याने उतरून नेला व ८ दिवसातच संपुर्ण प्लॉट रिकामा झाला.

वनरूट वरील द्राक्ष बाग

द्राक्ष जात थॉमसन १८ वर्षाचे झाड असताना अलींमध्ये दोन एकरात १७ टन द्राक्ष काढली. भाव ७१ रू. किलो मिळाला. आम्ही बावसकर टेक्नॉंलॉजीचा आधार प्रत्येक स्प्रे मध्ये घेतला. छाटणी तारीख १ जुलै असताना १०० दिवसात माल तयार झाला.

सुरवातीला पेस्टमध्ये जर्मिनेटर वापरले. काडीचे सबकेन डोळा सारखा फुटला तेथुन चांगली सुरवात असतांना माल भरपुर निघाला. घडसंख्या सुद्धा कमी केली. काडीवर दोन घड ठेवले. नंतर वांझ फुट काढून थ्राईवर + क्रॉंपशाईनर फवारले असतानां पान जाड होत गेले. त्यामुळे डाऊनी पहावयास मिळाला नाही व नंतर प्रत्येक स्प्रेमध्ये थ्राईवर व क्रॉंपशाईनर वापरत गेल्यामुळे भुरी सुद्धा पहावयास मिळाली नाही. नंतर १५ दिवसांचा घड असतांना पोपटी रंग होण्यासाठी न्युट्राटोन फवारले. पाऊस चालू असतानासुद्धा एकही घड जिरला नाही.

हार्मोनीमुळे द्राक्षावरील डाऊनी व भुरी पूर्णता आटोक्यात

फ्लावरींगमध्ये असतांना डाऊनी व भुरी येवू नये म्हणून हार्मोनीचे दोन स्प्रे घेतले, तर डाऊनी, भुरी पुर्णता आटोक्यात राहिला. प्रत्येक डीपींगच्या आधल्या दिवशी म्हणजे दोन दिवस अगोदर जर्मिनेटर पांढरी मुळीसाठी ड्रीपद्वारे दिले. एकरी दीड लिटरचा डोस दिला. घडाची लांबी व मण्यांची साईज चांगली मिळाली व मणी शेटींग कुज न होता चांगली झाली. नंतर ९० दिवसांचा प्लॉट असतांना कलरसाठी व गोडीसाठी राईपनर + ०:०:५० फवारले. नंतर ९५ दिवसांचा प्लॉट असतांना दोन दिवस जोराचा पाऊस झाला तरीही बागेत क्रेकींग दिसत नव्हती. नंतर १०५ दिवसांचा प्लॉट असतांना माल चालू केला व व्यापाऱ्याने ७१ रू. भावाने सर्व माल नेला.