जर्मिनेटरची प्रक्रिया केलेले कांदा रोप उत्तम मात्र प्रक्रिया न केलेले सड

श्री. शरद गेणुभाऊ शिंदे,
मु. पो. येणेरे, ता. जुन्नर, जि. पुणे,
मो. ९८९०० ५८१६९मी गेल्या दोन वर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान झेंडू, बिजलीला वापरत आहे. तर खराब हवामानातही पिकांचे रोग - किडीपासून संरक्षण होऊन उत्पादन वाढून मालाच्या दर्जात वाढ झाल्याने बाजारभाव चांगले मिसळतात, म्हणून चालू वर्षी कांद्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. जर्मिनेटर औषधाचा रिझल्ट मला अतिशय उत्तम आला आहे.

मी प्रत्येक पिकाला जर्मिनेटचा वापर करतो. त्यामुळे थंडीतही बियांची उगवण लवकर आणि खात्रीशीर होते. एरवी उगवण कमी होत असून रोपांच्या वाढीत फरक जाणवतो. मर होते. त्यामुळे तुटाळ पडते. ते जर्मिनेटर च्या वापरामुळे टाळले जाते व लागवड १०० % यशस्वी होते. चालू वर्षी कांद्याचे रोप मी दोन टप्प्यात लावले. पहिले रोप जर्मिनेटरमध्ये भिजवून लावले. दुसरे रोप न भिजवता लावले. तर माझे असे निदर्शनास आले कि जर्मिनेटरची प्रक्रिया केलेले रोप अतिशय उत्तम आले, तर न वापरलेले रोप मर होऊन पातळ झाले. तसेच ते पुढे सडू लागले. परंतु जर्मिनेटरमध्ये बुडवून लावलेले रोप अधिक पाऊस झाला असतानाही एकदम हिरवे होते. आता त्या कांद्याला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर घेऊन जात आहे.