हार्मोनीचा रिझल्ट कारले व दोडक्यास १०० %

श्री. सतीश एम. कुलकर्णी,
बीदर
मोबा. ९८८०८०१९८८


मी श्री. काशप्पा बाबशेट्टे, मु. पो. अळेंबर, ता. जि. बीदर यांना कारल्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञाना वापरण्यास सांगितले. कारले सायनोवा कंपनीचे वाण ३० गुंठ्यात लावलेले आहे. याला कल्पतरूची १ बॅग खत देऊन सप्तामृतची एक फवारणी घेण्यास उशीर झाल्याने आणि हवामान खराब असल्याने माल चालू झाल्यानंतर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला. पहिला तोड झाल्यानंतर डाऊनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्लॉट पुर्ण वाया जाण्याच्या मार्गात होता. उत्पादन पूर्णता थांबले होते. अशा परिस्थितीत हार्मोनी औषध फवारले असता डाऊनी १०० % आटोक्यात आला. तोडाही चालू झाला. २० किलो माल निघाला. कारले हिरवे, टवटवीत आणि सरळ असल्याने ३०० रू./१० किलो भाव बीदर मार्केटला मिळत आहे.

त्याचप्रमाणे श्री. अनिल घाळ्याप्पा बाबशेट्टे (०९९६४४६४६६३) यांनी दोडका सायनोवा कंपनीचा लिजा वाण ऑक्टोबर २०१० मध्ये १ एकर लावला होता. त्यांनीही सप्तामृत + हार्मोनीच्या आतापर्यंत २ फवारण्या घेतल्या आहेत. प्लॉट सध्या निरोगी असून तोडे चालू झालेत. दोडका सरळ, मध्यम लांबीचा कोवळा असलाने २०० ते २५० रू. भाव असताना ३०० रू./१० किलो भाव मिळत आहे. (मुलाखत फोनवरून ८/१२/२०१० रोजी सकाळी १० वा.)