सहा महिन्याच्या काजुच्या रोपांना १।। वर्षाची म्हणत

श्री. सुरेश पांडुरंग जाधव.
मु. पो. आवाशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी -४१५७१२.
मो. ९२२१५४५३७१


गेल्या ७/८ वर्षापासून आपली सप्तामृत औषधे वापरत आहे. आमच्याकडे एकूण ५० एकर क्षेत्र आहे. परंतु मजुराची अडचण असल्यामुळे आम्ही ८ ते १० एकरच क्षेत्र चालू आहे. त्यामध्ये आंब्याची एकूण ४० झाडे आहेत. काजूची नविन १००० झाडे आहेत. नारळ १०० आहेत. सुपारी २५० झाडे आहेत. आम्ही सर्व पिकांवर आपले तंत्रज्ञान वापरतो. आम्हाला सर्व पिकांवर चांगला फायदा झालेला आहे. शेवगा मोरिंगा २५० च्या दरम्यान आहे. यावर्षी कोकम १०० झाडे लावली आहेत. काळीमिरी १५० झाडे लावली आहेत.

२ गुंठ्यात २१०० किलो काकडी

यावर्षी जुनमध्ये काकडी लावली होती. ८ गुंठ्यामध्ये २१०० किलो माल निघाला. वेलींची वाढ चांगली झाली होती. माल हिरवागार, चमकदार होता, वाकडी किंवा किडकी काकडी निघाली नाही. आपल्या औषधांचे ४ - ५ स्प्रे घेतले. भाव साधारण ८०० रू. / क्विंटल मिळाला. आपल्या तंत्रज्ञानामुळे फुलगळ होत नाही. माल भरपूर लागतो. किड लागत नाही. अनावश्यक फवारणीचा खर्च वाचतो. माल काढल्यानंतर मार्केटला उशीरा नेला तरी मालाची चमक टिकून राहते. मालाला इतरांपेक्षा जास्त भाव मिळतो. इतरांपेक्षा वाढ झपाट्याने होऊन उत्पन्न लवकर चालू होते. एकूण आपल्या औषधाने आम्हाला भरपूर फायदा होत आहे. गेल्या वर्षी काजुची लागवड केल्यानंतर फुटवा निघत नव्हता. परंतु आपल्या औषधांचा स्प्रे केल्याने झपाट्याने वाढ होऊन फुटवा भरपूर निघाला व जेव्हा आजुबाजुचे लोक प्लॉट बघत, तेव्हा म्हणायचे की ही रोपे दीड वर्षाची आहेत. परंतु ती फक्त ६ महिन्याची रोपे होती. यावर्षी उत्पन्न घेणार आहे.