९ एकर काकडीचे १०० दिवसात ४ लाख

श्री. बद्रीनारायण विक्रम कायंदे,
मु. पो. मांडवा, ता. रिसोड, जि. वाशिम.
मो. ९१५८१२८४८४



आम्ही ८ वर्षापुर्वी शिवनेरी काकडीला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले होते. शिवनेरी काकडी हिवाळ्यात १० नोव्हेंबरला लावली होती. ९ एकर तांबड्या मातीच्या जमिनीमध्ये ड्रीपवर ५' x १' अंतरावर लागवड केलेली होती. या काकडीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची ५ - ५ लिटर औषधे २ वेळा नेली होती. त्याच्या ४ फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने केल्या. तर उत्पादन अतिशय चांगले मिळाले. वेल तार - काठीच्या आधारावर सोडले होते. हवा खेळती राहिल्यामुळे रोग - किडीसही प्रतिबंध झाला. प्लॉट पुर्णता निरोगी होता. ही काकडी ४५ दिवसात चालू झाली. १०० दिवसात १५ ते २० तोडे झाले. तोडा टप्प्याटप्प्याने करत होतो. २।। ती ३ टन उत्कृष्ट माल निघत होता. अकोला, अमरावतीला ८ ते १२ पासून १५ - २० रू. किलो या दराने काकडी विकली जात असे. काही माल नागपूरला पाठविला. नागपूर ३५० किमी अंतर असल्याने पुणे नागपूर सारखेच पडते. या ९ एकर काकडीचे १०० दिवसामध्ये ४ लाख रू. झाले होते.

जंबो डाळींब डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी करण्याचा संकल्प

आता जंबो डाळींब ७ एकरवर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने लावायचे आहे. तेव्हा काकडीच्या अनुभवावरून डाळींबासाठी सरांचा सल्ला घेण्यास आता (८ डिसेंबर २०१०) आलो आहे. आम्ही ६' x ६' वर डाळींब लागवड करून त्याची वाढ मर्यादीत ठेवून २ - ३ बहार घेणार आहे. नंतर झाडांची वाढ पुर्ण झाल्यावर मधील १ - १ झाड काढून टाकून मुख्य झाडांची जोमदार वाढ करून घेणार आहे तेव्हा डाळींब बाग आमच्या भागात चांगले येईल का या संदर्भात सरांना विचारले असता सरांनी सांगितले. "पश्चिम महाराष्ट्रातील बाग तेल्या रोगाने कमी झाल्याने डाळींब उत्पादन घटले आहे. त्यामुळे डाळींबाला भाव वाढतच राहणार आहे. विदर्भातील वातावरण स्वच्छ सुर्यप्रकाश असल्याने तेथे डाळींब चांगले येईल, मात्र त्यासाठी ६' x ६' अंतर चुकीचे ठरेल. तुम्ही जे म्हणत आहात की ६' x ६' वर लागवड करून १ - २ बहार घेतल्यानंतर १ - १ झाड काढून टाकणार आहे. त्यापेक्षा सुरूवातीलाच १२' x १२ अंतर ठेवून लागवड करा. आपली जमीन तांबड्या मातीची असल्याने डाळींबास योग्य आहे. तेव्हा आपण जरूर डाळींबाची लागवड करा."रक होता, तो भरून निघाला. २ महिन्यात ६ फुट वाढ झाली आहे.