प्रतिकूल परिस्थितीत १ एकर टोमॅटोपासून १५०० क्रेट टोमॅटो, निव्वळ नफा २ लाख

श्री. रामदास किसन गाडे (पोलीस पाटील),
मु. पो. सोमंतवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे.
मो. ९७६६८१४१८७


आम्ही १३८९ वाणाच्या टोमॅटोची (४ पुड्या बी) लागवड १ एकर क्षेत्रामध्ये जुलै २०१० च्या दुसऱ्या आठवड्यात केली होती. लागवड ३।। x २ फुटावर होती. जमीन भुरकट काळी आहे. पाणी बोअरचे १० ते १२ व्या दिवशी देत होते. या प्लॉटला एकरी १५ बैलगाडी शेणखत लागवडीपुर्वी देऊन खुरपणीच्या वेळी १०:२६:२६ च्या ६ बॅगा नंतर बांधणीच्यावेळी ४ बॅगा आणि मध्यंतरी माल चालू झाल्यावर पोटॅशच्या ४ आणि १०:२६:२६ च्या ४ बॅगा याप्रमाणात खताची मात्रा दिली.

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेटी

डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजी नारायणगाव शाखेचे प्रतिनिधी श्री. दिलीप अरगडे यांच्या मार्गदर्शनानुसार सप्तामृताच्या फवारण्या घेत गेलो. तर पावसाळी वातावरणात हवामान खराब असतानाही रोग - किडींची प्रादुर्भाव आटोक्यात होता. पाने हिरवीगार, जाड व लवयुक्त होती. फुटवा, फुलकळी तसेच झाडांवर मालाचे प्रमाण भरपूर होते. जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात १ नंबर प्लॉट होता. प्लॉट रस्त्याच्या कडेलाच असल्याने येणारे जाणारे प्लॉट पाहून विचारणा करत एवढ्या खराब हवामानात निरोगी व पुर्ण बहारात फळांनी लगडलेला प्लॉट कसा घेऊ शकलात ? यासाठी प्लॉटचे व्यवस्थापन कसे केले ? काय काय तंत्रज्ञान वापरले? यावर त्यांना एकच सांगत की वेळच्या वेळी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधीचे मार्गदर्शन व त्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर हे प्लॉटचे रहस्य आहे.

६५ दिवसात टोमॅटो तोडणीस आला, दररोज तोडा करत असे. १०० पासून जास्तीत जास्त ३०० क्रेट माल एका तोड्याला काढला आहे. पुढे नवीन फुटवा होण्यासाठी सप्तामृताच्या फवारण्या घेतल्या, तर त्याच्या (खोडव्याच्या) मालाचा १५ डिसेंबरला शेवट झाला.

अति पावसातही फळे उत्तम

डॉ. बावसकर तंत्रज्ञानामुळे एक एकर क्षेत्रापासून १५०० क्रेट टोमॅटो उत्पादन मिळाले. त्यातील ७०० ते ८०० क्रेट टोमॅटो आमच्या गावातील श्री. नारायण विष्णू ठोसर यांनी एक्सपोर्टसाठी नेला. त्यांनी २८० ते ३०० रू. क्रेट भाव दिला. बाकी माल नारायणगाव मार्केटला १५० रू. पासून २७० रू. /क्रेट प्रमाणे विकला गेला. खोडवा फुटीला लागलेला माल १०० ते १५० रू. ने गेला. मागील १५ दिवसापुर्वी अवकाळी पाऊस चालू झाला. तो आठवडाभर उघडलाच नाही. त्याने झाडाची सर्व पाने गळून गेली. मात्र फळगळ झाली नाही. त्याचा संपुर्ण तोडा केला आणि प्लॉट काढून टाकला. तर त्या तोड्याला २५ ते ३० क्रेट माल निघाला. तो १५० रू. प्रमाणे विकला गेला. या १ एकर क्षेत्रातून १५०० क्रेट पासून अडीच लाख रू. उत्पन्न मिळाले. यासाठी ५० हजार रू. एकूण खर्च आला.

बटाट्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

सध्या एस - १ बटाट्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहे. बटाटा २ महिन्याचा झाला आहे. क्षेत्र ३ एकर असून लागवड सरीपद्धतीची आहे. याला लावताना १८:४६ च्या १७ बॅगा आणि १ महिन्यानंतर १०:२६:२६ च्या १२ बॅगा खत दिलेले आहे.

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची मागील १५ दिवसांपुर्वी फवारणी केली. त्यामुळे पाने रुंद, जाड झाली आहेत. पानांना काळोखी, शाईनिंग आली आहे. आता १ महिना बटाटा काढणीस अवधी आहे. हा काळ बटाटा पोसण्याचा असल्याने चांगले पोषण होण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनरबरोबर, राईपनर आणि न्युट्राटोनच्या १ ते २ फवारण्या घेणार आहे.