पावसाने सर्वांची रोपे गेली, माझे मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कांदा रोप जोमदार

श्री. रोहिदास रामभाऊ आमले,
मु. धोलेवाडी, पो. शिरोली बु॥, ता. जुन्नर, जि. पुणे.
मोबा.९८९०४१७१४४


मी ४ वर्षापासून टोमॅटो, कांदा, ऊस, भुईमूग, फरशी या पिकांना डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरतो. त्यामुळे खराब हवामानातही आम्हाला चांगले उत्पादन मिळते.

चालूवर्षी कांद्याने घरगुती धरलेले ७ किलो बी आणि ३ किलो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, नारायणगाव शाखेतून घेतलेले बी या दोन्ही बियाला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून बी टाकले असता दोन्ही बियांची १०० % उगवण झाली. वाफ्यावर बी टाकण्यापुर्वी कल्पतरू खत टाकल्याने वाढ जोमाने झाली. १५ दिवसांचे रोप असताना जर्मिनेटर थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली पंपाला घेऊन फवारणी केली. त्यामुळे रोपे पिवळी पडली नाही. करपा आल नाही. रोपाला एकप्रकारची शायनिंग आली. नंतर ८ दिवसांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली आणि कॅनॉन २० मिली प्रतिपंपास घेऊन फवारणी केली. त्यामुळे भर पावसातदेखील रोपांचे नुकसान झाले नाही. रोप एकदम हिरवेगार होते. माझ्या शेजारील १० -१२ शेतकऱ्यांचे अति पावसाने रोप वाया गेले. त्यांनी माझे रोप पाहिले तर अवाक झाले आता पुनर्लागवडीच्या वेळी आणि पुढील फवारण्यांसाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरणार आहे.