डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५ एकरात ७० ते ७५ क्विंटल कापूस तर फडदडपासून ३५ ते ४० क्विंटल उत्पादन अपेक्षित

श्री. गंगाराम आबाजी पंधारे, मु. पो. पाडळी, ता. शिरूर कासार, जि. बीड,
मोबा. ७७०९४८०७९४


गेल्यावर्षी प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून ४ एकरात मुख्यपीक व फडदडपासून एकरी १६ क्विंटल दर्जेदार उत्पादन निघाल्यामुळे ६ हजार रू./क्विंटल मिळून ३ लाख रू. झाले होते. (संदर्भ : कृषी विज्ञान, नोव्हेंबर २०११, पान नं. ४१ ) या अनुभवावरून चालू वर्षी जुलै २०११ मध्ये लावलेले बीटी ५ एकरातील कापसास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सुरूवातीपासून ४ फवारण्या केल्या तर फुटवा, वाढ भरपूर होऊन प्रत्येक झाडावर ८० ते ९० दोडी लागून फुलपात्या चालूच होत्या. एरवी उन्हाने पाते गळ होते. या अवस्थेत सप्तामृत औषधांची फवारणी घेतल्यामुळे गळ अजिबात झाली नाही. नंतर बोंडे पोसण्याच्या काळात २ फवारण्या घेतल्या पोषण अतिशय चांगले झाले.

कापसाची वेचणी दिवाळीनंतर सुरू झाली. तर २ - ३ बोंडांच्या वेचणीतच गच्च मुठभर कापूस निघत होता. पुर्ण अमललेला पांढरा शुभ्र कापूस मिळाला. एकूण ४ वेचण्या झाल्या आहेत. तर ५ एकरात ७० क्विंटल कापूस निघाला आहे. अजून ४ - ५ क्विंटल वेचणीचा कापूस बाकी आहे.

स्वतंत्र १ विहीर, २ बोअर आहे. पाणी भरपूर आहे. याच कापसास पुन्हा पाणी देऊन खोडवा धरला आहे. खोडव्याला १ फवारणी केली आहे. तर पाते भरपूर लागले आहे. या खोडव्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३५ ते ४० क्विंटल उत्पादन निघेल. या खोडव्यातच बाजरी, मका, हरभरा यांचे आंतरपीकही घेतले आहे. बाजरी गुडघ्याला लागत आहे. हरभरा खुरपणीला आला आहे, तर मका उगवत आहे.

सध्या कापसाचे भाव पडलेले आहेत. ४ हजार ते ४२०० रू. भाव चालू आहे. आम्ही कापूस साठवून ठेवला आहे. जानेवारी नंतर भाव वाढल्यावर विक्री करणार आहे.