अति पावसात फ्लॉवर, कोथिंबीरीचे अधिक दर्जेदार उत्पादन

श्री. तानाजी दत्तात्रय आरोटे,
मु.पो. उछपूर, ता. जुन्नर, जि. पुणे.
मोबा. ९७६७५६४९५३


माझ्याकडे ५ एकर मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन असून त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, फ्लॉवर अशी पिके घेतो. फ्लॉवर लागवडीसाठी बरखा जातीचे १५ पुड्या बियाणे गादीवाफ्यावर टाकले. रोपे लागवडीला आली त्यावेळी मी नारायणगावला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. तेथे प्रतिनिधी श्री. अरगडे यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची कांदा, कोथिंबीर, फ्लॉवर या पिकांसंदर्भात माहिती दिली.

त्यानुसार फ्लॉवरची रोपे २५ ऑगस्टला जर्मिनेटरच्या द्रावणात मुळ्या बुडवून लावली. त्याचवेळी दीड एकर धना टाकण्यासाठी जर्मिनेटरच्या द्रावणात बियाणे १२ तास भिजवून २८ ऑगस्टला टाकले होते. त्याने धन्याची ९० % हून अधिक उगवण झाल्याचे जाणवले. तसेच फ्लॉवरचीही रोपे नांगी न पडता वाढू लागली. रोपे लागवडीनंतर गणपतीच्या वेळेला आमच्या भागात सतत पाऊस पडत होता. त्यामुळे आता फ्लॉवरचे तसेच कोथिंबीरीचे पीक वाया जाते की काय असे वाटत होते.

कारण कोथिंबीर फक्त तीन पानावर त्यावेळी होती आणि रानात पाणी साठत होते. तेव्हा ही पिके वाचवण्यासाठी नारायणगावला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्रात संपर्क साधून वेळोवेळी सल्ला घेवू लागलो. त्यानुसार या दोन्ही पिकांना जर्मिनेटर, थ्राईवर ची फवारणी केली. पाऊस अधिक प्रमाणात असूनही पिके सुस्थितीत राहिली. त्यानंतर कोथिंबीरीला आठवड्याने जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ४० मिलीची १५ लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने कोथिंबीरीची अजिबात सड झाली नाही. पाने हिरवीगार होती. मर अजिबात नव्हती. अशा परिस्थितीत कोथिंबीर २५ दिवसांनी असताना तिसरी (शेवटची) फवारणी फक्त क्रॉंपशाईनरची काढणीपूर्वी पंपास ५० मिली याप्रमाणे घेऊन केली. त्याने देठ, पाने हिरवीगार, रसरशीत तयार झाली. पाने अजिबात करपली नाही. पाने तेलातून काढल्यासारखी चमकत होती.

कोथिंबीरीचे ८,५०० गड्ड्याने ४५ हजार

या कोथिंबीरीची ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात काढणीस सुरुवात केली. नारायणगाव, ओतूर मार्केटला २०० ते ३०० रू. शेकडा भाव असताना ४०० ते ६०० रू. शेकडा भाव आमच्या कोथिंबीरीस मिळाला. आतापर्यंत ८५०० गड्ड्या कोथिंबीरीच्या निघाल्या असून त्याचे ४५,००० रू. झाले. पुढे बाजारभाव थोडे वाढले त्यामुळे १३ ऑक्टोबरला कोथिंबीर ८०० रू. शेकडा भावाने गेली.

फ्लॉवर दोन महिन्याची झाली होती तेव्हा करपा आला होता. तेव्हा नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून थ्राईवर, क्रॉंपशाईनची फवारणी केली. तर करपा पूर्णता गेला. पुढे नियमित सप्तामृत औषधांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार फवारण्या घेवू लागलो. त्यामुळे त्यानंतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. गड्ड्यांचे पोषण अतिशय चांगले झाले. गड्डे दीड ते दोन - अडीच किलोचे मिळाले. गड्डा पांढराशुभ्र असल्याने भाव १५ ते २० रू. किलो मिळाला. अजून उत्पादन चालू आहे.

कांद्याने १० किलो बी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून ७ ऑक्टोबरला टाकले. त्याची ९० - ९५ % उगवण झाली. रोप सर्व ठिकाणी एकसमान दिसत आहे. अशाप्रकारे सर्व पिके प्रतिकुल परिस्थितीत (अति पावसात) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वीरित्या घेता आली. यामध्ये नारायणगावचे प्रतिनिधी श्री. अरगडे यांचे मोबाईलद्वारे गरज पडेल तेव्हा - तेव्हा मार्गदर्शन लाभले. धन्यवाद !