फुलकळी गळायची थांबली, दरवर्षी काळी पडणारी सिताफळे यंदा चांगली तयार झाली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे

श्री. चांद आबू शेख,
मु.पो. कन्हेरी, ता. खंडाळा, जि. सातारा.
मोबा. ९८८१६९२६४२


आम्ही ८ वर्षापुर्वी लोकल व्हरायटी (कन्हेरी) वाणाची सिताफळाची २०० झाडे १३' x १३' वर लावलेली आहेत आणि ६ वर्षापुर्वी १०० झाडे लावली आहेत. जमीन मध्यम प्रतीची निचऱ्याची आहे. पाणी विहीरीचे आहे. मात्र उन्हाळ्यात कमी पडते म्हणून जूनचा पावसाळी बहर धरतो. बाग ३ वर्षाच्या झाल्यानंतर बहार चालू झाला.

गेल्यावर्षीपर्यंत ३ -४ बहार घेतले. मात्र प्रत्येक बहाराला दोन अडचणींना सामोरे जावे लागत होते. एक म्हणजे बहार लागताना निघालेली फुलकळी जळून गळून पडत असे. त्यामुळे झाडावर फारच कमी म्हणजे १५ ते २० च फळे लागत होती. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे लागलेली फळे पुढे चिकूहून थोडी मोठी होऊ लागताच काळी पडण्यास सुरुवात होत होती. चांगल्या फळांना बाजारभाव जर १०० रू. किलो असला तर अशा काळ्या फळांना १५ ते २० रू. किलोच म्हणजे बदला भावात ती विकावी लागत आणि अशा समस्यांमुळे गेली ३ वर्षे उत्पादन खर्च ही निघत नसल्याने बाग काढून टाकण्याच्या विचारात होतो. अशा परिस्थतीत गेल्यावर्षी पूणे मार्केटला आलो असता यावर काही उपाय आहे का ? म्हणून चौकशी करीत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमधून मला सप्तामृत औषधासंबंधी माहिती मिळाली. त्यावेळेस नुकताच भार धरला होता. फुलकळी लागली होती. नेहमीप्रमाणे तिची गळही सुरू झाली होती. मात्र यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ऑफिसमधून सप्तामृत घेऊन गेलो. त्याची फवारणी केली असता गेल्या ३ - ४ वर्षापासून जी फुलगळची समस्या होती. ती या बहारामध्ये जाणवली नाही. फुलगळ पुर्णत : जागेवर थांबली. फळांची साईज नेहमीप्रमाणे चांगली मिळाली. परंतु नेहमी जी फळे काळी पडत होती. ती अजिबात काळी पडली नाही. आमच्या गावातील बागांमध्ये फळे काळी पडण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे शेतकरी आम्हाला विचारू लागले. तुमची फळे कशी काय एवढी चांगली आहेत ? काय फवारले. तेव्हा मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत फवारले, असे सांगितले. विशेष म्हणजे आमचे फळांना पिवळसर सोनेरी मोठे होळे पडले होते. त्यामुळे बाजारभाव चांगले मिळाले.

एका फवारणीवर ७५ पाटी माल

३०० पैकी काही झाडे खराब झाली आहेत. २५० झाडांपासून उत्पादन चालू आहे. दरवर्षी २५० झाडांपासून ५० पाटी (२५ किलोची) माल निघत होता. तो एका फवारणीवर ७५ पाटी माल गेल्या बहारापासून निघाला.

जूनमध्ये पाऊस झाल्यावर १५ दिवसांनी फुलकळी लागते. ऑक्टोबरच्या सुरुवातीस माल चालू झाला. महिनाभर माल चालला. वाशी मार्केटला ५ राशी करून माल विकला. २० रू., ४० रू., ६० रू., ८० रू., १०० रू. किलो अशी रास असते. ६० ते ८० रू. / किलो भावाने जाणारी रास जास्त निघाली.

या अनुभवावरून पुढील वर्षी जून २०१२ च्या बहारास डॉ.बावसकर तंत्रज्ञान सुरूवातीपासूनच वापरणार आहे. तसेच गेल्या खरीप हंगामात केलेल्या वरुण घेवाड्याला फुलगळ झाल्यामुळे प्रत्येक झाडापासून ४ - ५ च शेंगा निघाल्या. त्यामुळे उत्पादनात खूपच घट आली. बाजार भाव ५० रू./किलो आहे. मात्र माल कमी निघाल्याने काहीच परवडले नाही. त्याकरिता पुढील हंगामातील घेवड्यासाठी देखील हे तंत्रज्ञान वापरणार आहे.