पुर्वानुभवातून उशीरा का होईना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याची प्रेरणा !

श्री. लक्ष्मण महादेव गवळी,
मु. पो. वाकी (शिवणे), ता. सांगोला, जि. सोलापूर,
मो. ९७६३९०२३९७


मी २० वर्षापुर्वी गणेश डाळींबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे पंचामृत वापरले होते. तर फळांच्या क्वॉलिटीत सुधारणा झाली होती. त्यानंतर मात्र जवळच्या दुकानदाराकडून घरपोच व उधार निरूपयोगी औषधे मिळू लागल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीपासून दुरावलो. यामध्ये मात्र इतर रासायनिक औषधांनी आम्ही शेती उत्पन्नात गोत्यात गेलो.

चालू वर्षी ऑगस्टमध्ये भगव्याच्या १५ वर्षापुर्वीच्या मोठ्या १० झाडांवर ३ हजार गुट्या बांधल्या होत्या. १५०० गुट्यांना 'जर्मिनेटर' वापरले तर त्यातील १००% गुट्या फुटल्या आणि जर्मिनेटर न वापरलेल्या गुट्या फक्त ३५ ते ४०% च फुटल्या. या अनुभवातून पुन्हा एकदा आमच्या लक्षात आले की आपणास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीशिवाय पर्याय नाही. वरील गुट्यांमधील रोपे तयार केल्यानंतर त्यापैकी ७०० रोपे दिड महिन्यापुर्वी ६' x ६' वर लावली आहेत. मागच्या महिन्यातच काही झाडांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यासाठी डॉ.बावसकर सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी खास आज (२९ नोव्हेंबर २०१३) आलो आहे. सरांना सदर परिस्थिती सांगितल्यावर सरांनी विचारले, बागेला पाणी किती वेळ देत आहार ? तेव्हा मी सांगितले दररोज ३ - ४ तास पाणी देतोय. यावर सर म्हणाले, हवेत गारठा आहे. आर्द्रता भरपूर आहे. पाणी आहे म्हणून ३ - ४ तास दररोज देताय हे पुर्णत: चुकीचे आहे. प्रथम पाणी कमी करा आणि बागेला जर्मिनेटर १ लि. + कॉपरऑक्झिक्लोराईद १ किलोचे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा.

यानंतर सरांना विचारले, सीताफळ १५' x १५' वर आहे. त्यामध्येच हे डाळींब लावले आहे. डाळींबाच्या दोन झाडातील अंतर ६ x ६ फूट आहे. यावर सरांनी सांगितले, "आपण अंतर खुपच कमी ठेवले आहे. एकतर सिताफळात डाळींब लावायलाच नको होते. डाळींबाचे पीक स्वतंत्र व तेही १५' x १५' वर पाहिजे होते. जमीन हलकी व पाणी कमी असल्याने सिताफळाच्या झाडांची वाढ कमी आहे. सिताफळ डोक्याएवढीच आहेत. फळे भरपूर येतात, मात्र क्वोलिटी मिळत नाही. म्हणून पुढे सिताफळ काढून टाकणार आहे. तरी यावर सरंनी सांगितले. सिताफळ जरी काढले तरी तुम्हाला डाळिंबाचे मधले झाडदेखील दोन्ही बाजुच्या ओळीतील काढावे लागेल. म्हणजे डाळींबातील आंतर किमान १२' x १२' होईल.

गावरान आंबा २५ वर्षाचे ५ झाडे आहेत. त्यांचा बुंधा २० वर्षापुर्वी छाटून त्यामध्ये रत्नाची काडी धरून ती झाडे आता ३० - ४० फूट उंचीची झाली आहेत. याचा बहार धरण्यासाठी सरांनी सांगितले. जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + थ्राईवर १।। लि. + क्रॉपशाईनर २ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + कॉपरऑक्झीक्लोराईद १ किलोची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी करा आणि ५ ते ७ किलो कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक खोडाला तीन इंच खोल आळे तयार करून द्या. म्हणजे संक्रांतीपर्यंत भरपूर मोहोर येईल. तसेच खोडला किड लागू नये म्हणून मोरचूद ५०० ग्रॅम + गेरु ५०० ग्रॅम + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + चुना २५० ग्रॅमचे १० लि. पाण्यात द्रावण तयार करून खोडाला ३ फूट उंचीपर्यंत तागाच्या ब्रशने लावा.

नवीन केशर आंब्याची ५० झाडे कंबरेबरोबर आहेत त्याला वाढीसाठी सरांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईन, प्रिझम प्रत्येकी २५० मिल १०० लि. पाण्यातून फवारण्यास सांगितले तसेच खोडाला कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम देण्यास सांगितले त्याप्रमाणे वापर करणार आहे.

मोठ्या मक्याला आताच तुरा टाकला आहे. त्याला कणसे पोसण्यासाठी २ लि. न्युट्राटोन २०० लि. पाण्यातून एकदाच फवारावे. म्हणजे सव्वा पट उत्पादन वाढेल, असे सरांनी सांगितले.

लहान मका १। एकरमध्ये पेरली आहे. त्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलो २५० लि. पाण्यातून २ - ३ वेळा फवारण्यास सांगितले म्हणजे मक्याची वाढ जोमाने होऊन पुढे कणसे पोसण्यासाठी पंचामृताबरोबर राईपनर आणि न्युट्राटोन फवारल्यास नेहमीच्या उत्पादनापेक्षा १।। ते दुप्पट वाढ होईल. वरील सरांच्या मार्गदर्शनानुसार सप्तामृत १० - १० लि. घेऊन जात आहे व त्याचा तंतोतंत वापर करून उत्पादनात निश्चितच वाढ होईल अशी खात्री आहे.