१।। एकर टोमॅटो ३१ टन, ३।। ते ४ लाख

श्री. सचिन दहिवडकर,
मु. पो. मालवंडी, ता. बार्शी, जि. सोलापूर.
मोबा. ८८०५०५९५९४


२ वर्षापुर्वी टोमॅटो व द्राक्ष पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला होता. टोमॅटो वर लागवडीपासून काढणीपर्यंत सप्तामृत औषधांच्या १५ दिवसाच्या अंतराने एकूण ५ फवारण्या केल्या होत्या, तर टोमॅटो कुठल्याही रोगाला बळी न पडता झाडांची वाढ, फुट भरपूर झाली होती. फुलकळी लागण्याच्या वेळेस सप्तामृत फवारणी केल्यामुळे फलधारणा भरपूर झाली. फळांचे पोषण होण्यासाठी राईपनर व न्युट्राटोनचा थ्राईवर, क्रॉंपशाईन सोबत वापर केल्याने फळे एकसारखी व वजनदार तसेच फळांना आकर्षक चमक होती. त्यामुळे बाजारभाव १० ते १२ रू./किलो असताना आम्हाला १२ रू. पासून २० रू. पर्यंत मिळाले. एकूण १।। एकर क्षेत्रातून ३० ते ३२ टन उत्पादन मिळाले, त्याचे ३।। ते ४ लाख रू. झाले.

द्राक्षाचे १। एकरात ३।। ते ४ लाख

याचवेळी द्राक्षालादेखील डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरले. जर्मिनेटर ड्रिपने सोडले होते. तसेच थ्राईवर, क्रॉपशाईनर व राईपनरच्या ४ ते ५ मिली/लि. पाणी याप्रमाणे गरजेप्रमाणे ४ फवारण्या केल्या होत्या. त्यामुळे घडांची लांबी वाढून घड वजनदार मिळाले. घडांवर अपेक्षेपेक्षा जास्त चमक होती. पाकळ्या रुंद होत्या. व्यापाऱ्यांची जागेवरून १५ रू. किलोने माल उचलला. एकूण २५ टन उत्पादन मिळाले. त्याचे ३।। ते ४ लाख रू. १। एकरात झाले.

या अनुभवावरून चालू वर्षी बोंबल्या घेवड्यासाठी डॉ. बावसकर तंत्रज्ञान किसान प्रदर्शना तून नेले असून ते वापरणार आहे. सध्या घेवड्याची पाने पिवळी पडत असून मावा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आज (२२ डिसेंबर २०१३) आलो आहे.