डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने काकडी अकोला, इंदोर, सुरत मार्केटला १ नंबर ४ एकरात १० लाख, सर्व खर्च ४ लाख, लिंबाच्या व पेरूच्या १५ - १५ एकर बागा अप्रतिम

श्री. अवधुत गडबड महाजन,
मु.पो. चुंचाळे, ता. चोपडा, जि. जळगाव,
मोबा. ९५६१८३६९०५



माझ्याकडे एकूण ५८ एकर शेतजमीन असून त्यामध्ये काकडी, पेरू, लिंबू, केळी, कापूस, ज्वारी, मका अशी पिके घेतो.

गेल्या ५ - ६ वर्षापासून आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने काकडी, पेरू, लिंबाचे विक्रमी उत्पादन घेत आहे. बाकी केळी, कापूस, मका, जवारी ही पिके पारंपारिक रासायनिक खते, औषधांवरच घेतो. केळी २० - २२ एकर असते. कापूस १० - १५ एकर असतो. जवारी, मका ४ - ५ एकर असते.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने काकडी अप्रतिम

काकडी गोल्डन सिडस - १२२ ची चालूवर्षी ४ एकर इनलाईन ड्रीपवर लावली आहे. बेड (इनलाईन ) ८ - ८ फुटावर आहे. इनलाईनच्या दोन्ही बाजूस ९ - ९ इंचावर आणि त्या ओळीतील अंतर १।। - १।। फूट असे लागवडीतील अंतर ठेवले आहे. प्रथम बेसल डोसमध्ये एकरी कल्पतरू १ बॅग, १०:२६:२६ ची १ बॅग, अमोनिअम सल्फेट १ बॅग, पोटॅशियम १ बॅग, दुय्यम अन्नद्रव्ये (२५ किलो) १ बॅग असा दिला. नंतर बी जर्मिनेटर ची बीजप्रक्रिया करून ऑगस्ट २०१४ मध्ये टोकले. तर उगवण जवळ - जवळ ९५% पेक्षा जास्त झाली. वेलांची वाढदेखील जोमाने सुरू झाली. तार काठींचा मांडव केला होता. प्रत्येक १० दिवसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृतची फवारणी घेत होतो. त्यामुळे ३० दिवसातच फुल लागून ३५ दिवसात काकडी बऱ्यापैकी दिसू लागली. ४५ दिवसांपासून दिवसाड नियमित तोडे चालू झाले. मध्ये डावणी, करपा, भुरीवर रासायनिक (अॅमिस्टर, कवच, कोरोजन, रेडोमील) बुरशीनाशकाची आवश्यकतेनुसार फवारणी करत असे. तसेच पांढऱ्या माशीसाठी किटकनाशक फवारत असे.

१५ - १५ दिवसाला विद्राव्य खते एकरी ३ किलो देतो. यामध्ये पीक परिस्थिती (गरजेनुसार) १९:१९:१९, ०:३४, ०:०:५० या प्रमाणातील खतांचा वापर करतो.

दर १० व्या दिवशी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची दर १० व्या दिवशी फवारणी असतेच. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही वेलांची वाढ झपाट्याने होते. तसेच फुलकळी भरपूर लागून गळ होत नाही. फळधारणा प्रचंड होते. तसेच फळांचे लवकर - लवकर पोषण होते. त्यामुळे दिवसाड २।। ते ३ टन माल ४ एकरातून मिळतो. ही काकडी १।। महिना चालते. सुरत, अकोला, इंदोर मार्केटला पाठवितो, तेथे बाजारातील चढ - उतारानुसार १५ ते २० रू./किलोने विक्री होते. अशा पद्धतीने एकरी १७ ते १८ टन उत्पादन मिळते. यासाठी एकरी १ लाख रू. पर्यंत खर्च होतो व उत्पन्न ३ ते ३।। लाख रू. होते.

मालाची तोडणी सकाळी ८ वाजल्यापासून २ वाजेपर्यंत करतो. ३ टन माल तोडणीस २० - २२ लोक (बाया - माणसे) लागतात. २ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत पॅकिंग कांद्याच्या बारदाण्यात २५ किलोचे करतो. त्यानंतर ५ वाजता गाडी भरून इंदोर, अकोला, सुरत मार्केटला पाठवित असतो. आमच्याकडे बायांना १५० रू. मजूरी (दिवसाची) आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने काकडीचा प्लॉट अतिशय दर्जेदार तयार होतो की, लोक लांबून - लांबून पाहण्यास येतात. वेल लांबलचक, पाने हिरवीगार, वेल पाने, फुले, फळांनी लगडलेले, आकर्षक, मालाला चमक व कोवळी लुसलुशीत, चवदार काकडी असल्याने बाजारपेठेतील भावापेक्षा २ ते ४ रू./किलोस जादा भाव मिळतो. अशा पद्धतीने ४ एकरातून सर्व खर्च वजा जाता ८ ते १० लाख रू. चे उत्पन्न मिळते.

पुण्यामध्ये कृषी प्रदर्शन पाहताना माझी श्री. सदाशिव भगत (राजुरी, पुरंदर जि. पुणे) मो. ९०९६४७८२७५ यांची भेट झाली. ते प्रगतीशिल व प्रयोगशिल शेतकरी आहेत. त्यांनी आम्हाला काकडी पिकाबद्दल मार्गदर्शन केले होते. त्यांची माझी फोनवरून सल्ला मसलत होत असते. ते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शेवगा, मेथीचे विक्रमी उत्पादन ते घेत आहेत.

१५ वर्षापुर्वीची लिंबाची बाग भाव इतरांपेक्षा ५ ते १० रू. जादा

आमच्याकडे १५ वर्षापुर्वीची कागदी लिंबाची ५ एकर बाग आहे. भारी काळ्या जमिनीत २२' x २०' वर झाडे आहेत. याचे २ - ३ बहार येतात. आम्ही मात्र डिसेंबरचा बहार धरतो. तो एप्रिल मध्ये ऐन उन्हाळ्यात चालू होतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा फुलगळ - फळगळ होऊ नये म्हणून १५ - १५ दिवसांनी त्या कालावधीत २ फवारण्या करतो. बाकी काही फवारत नाही. एप्रिल - मे - जून मध्ये लिंबू उत्पादन मिळते. एका झाडापासून ५ ते ७ गोण्या माल निघतो. लिंबू विक्रीस सुरतला पाठवितो. ३० ते ५० रू./किलो भाव मिळतो. किलोमध्ये १२ ते १६ फळे बसतात. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमुळे फळांना शायनिंग जास्त येते. त्यामुळे मार्केटमध्ये ५ ते १० रू./किलो स भाव जादा मिळतो.

सरदार पेरूची जुनी बाग फळावर, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने देवी नाही, झाडांवर ५ - ६ क्रेट माल

सरदार लखनौ ४९ पेरूची १० वर्षापुर्वी २०' x २०' वर २।। एकरमध्ये लावलेली ४०० झाडे आहेत. याला मार्च - एप्रिलमध्ये ताण देतो. जुनमध्ये पाणी देतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ - ४ फवारण्या घेतो. सुरूवातीची बहार फुटण्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी करतो. नंतर फुल व लहान फळे गळू नये म्हणून थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट फवारतो. त्यानंतर फुगवणीसाठी व मालाचा दर्जा वाढून फळांना आकर्षक चमक, टवटवीतपणा येण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन फवारतो. अशा पद्धतीने फळे नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये चालू होतात. ती फेब्रुवारीपर्यंत चालतात. झाडे जुनी मोठी असल्याने एका झाडापासून ५ ते ६ क्रेट पेरू मिळतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फळांना आकर्षक चमक येते. फळांवर देवी येत नाही. बाकी ६ ते ७ वर्षाची ३ एकरमध्ये ११०० झाडे आहेत. त्यालादेखील हे तंत्रज्ञान वापरणार आहे.