उसाचे एकरी टनेज डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ८० येतेच, पण ते १०० टन नेण्याचा मानस

श्री. दिगंबर रामचंद्र ठोंबरे,
मु.पो. सुरडी, ता. केज, जि. बीड,
मोबा. ८३०८९८६५२५


सोयाबीन, गहू, हरबरा, ज्वारी, तूर, ऊस या पिकांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी मागील १५ वर्षापासून वापरत आहे. एकूण २३ एकर जमीन आहे. मांजरा प्रकल्पावरून ३ इंची पाईपलाईनने ७००० फुटावरून पाणी आणले आहे. २ विहीरी आहेत.

ऊस लागवडीच्यावेळी बेणे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावतो. त्यामुळे डोळे मोठे होऊन उगवणशक्ती वाढते. शिवाय उगवणीपासून ६० दिवसांपर्यंत न खत घालता पिकावर तेज कायम राहते.

उगवणीनंतर ३० दिवसांनी पहिली फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर आणि १९:१९:१९ ची एकत्र करतो. त्यामुळे फुटवा जास्त निघतो. वाढ चांगली होते. त्यानंतर दर १५ - २० दिवसांनी ४ महिन्याचा डोक्याएवढा ऊस होईपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या करतो. अशा पद्धतीने उसावर एकूण ५ फवारण्या करतो. जमीन भारी काळी असून पाणी पाटाने देतो. लागवड ४ फुटाच्या सरीला २ डोळ्याची कांडी (टक्कर) अशी असतो.

लागवडीच्यावेळी १८:४६ एकरी २ पोती, १०:२६:२६ ची २ पोती आणि शेणखत २० - २२ गाड्या सरी काढल्यानंतर सरीतून देऊन मग पाण्यातील ओली लागवड करतो. नंतर २ महिन्याचा ऊस झाल्यावर एकरी युरीया १ पोते, पोटॅश १ पोते, सुपर फॉस्फेट १ पोते, १०:२६:२६ चे १ पोते याप्रमाणे खत देतो.

त्यानंतर बांधणी करतानादेखील वरील डोस रिपीट करतो. त्यानंतर मात्र कोणतेही खत देत नाही. पाणी जमीन वरून थोडी भेगाळायला लागल्यावरच देतो. सारखे पाणी देत नाही. गरजेपुरतेच पाणी देतो.

अशा पद्धतीने एकरी ८० टनापर्यंत ऊस उत्पादन निघत आहे. त्या भागात सरासरी ५० टनाचे उत्पादन मिळते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे ३० टन उत्पादन वाढते. माझे स्वप्न आहे की, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकरी १०० टन उत्पादन काढायचे. त्यासाठी आज (३/१२/१४) सरांची भेट घेण्यास आलो आहे.

उसातील सोयाबीन ११० क्विंटल

४ फूट उसाच्या सरीमध्ये सोयाबीनची १ ओळ असते. त्यापासून १० ते १२ क्विंटल उत्पादन ऊस बांधणीच्या अगोदर मिळते. शिवाय सोयाबीन पाल्याचा बेवड असाला फायदेशीर ठरतो. सोयाबीनला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ फवारण्या करतो. पहिली लागवडीनंतर २५ दिवसाला, दुसरी ४५ दिवसाला व शेवटची ७० दिवसांनी करतो, ११० दिवसात सोयाबीन काढणीस येते. आमच्या भागात भारी काळी जमीन व पाणी असल्याने पीक निघण्यास उशीर लागतो.

ज्वारी १० ते १२ पोती

ज्वारीला उगवणीनंतर १।। महिन्यानी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर) १ फवारणी करतो. ज्वारीला १८:४६ ची १ गोणी देतो. ज्वारीचे एकरी १० - १२ पोती उत्पादन होते.

तूर १० ते १२ क्विंटल

तूर जुनची लागवड असते. जर्मिनेटरची बीजप्रक्रिया सर्वच पिकांला करतो. त्यामुळे उगवण खात्रीशीर होते. एकरी १० - १२ क्विंटल उत्पादन मिळते. आम्ही पहिल्यांदा १८:४६ खत पेरून नंतर बायांकडून त्या काकरी मध्ये ९'' - ९'' वर तूर टोकतो. २ ओळी तुरीच्या व २ ओळी सोयाबीनच्या अशी पीक पद्धती असते. कर्नाटकी लाल तूर असते. सोयाबीन निघाल्यावर पाळी घालून तुरीला मातीची भर लावतो. पाणी आवश्यकता भासली तरच देतो. अन्यता पावसावरच तूर, सोयाबीन ही पिके निघतात.

गहू २५ ते ३० क्विंटल

गव्हाला ४० दिवसांचे पीक असताना एक फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर ची करतो. त्यामुळे फुटवा भरपूर होतो. गहू २१८९ असतो. एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

प्रतिकूल परिस्थितीत बटाट्याचा प्लॉट करपामुक्त

२००७ साली मंचरवरून बटाट्याचे १० क्विंटल बेणे नेले होते. त्यावेळी पुण्याहून जाताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची ३००० रू. ची औषधे नेली होती. त्याच्या ३ फवारण्या केल्या, तर एकरी ७० क्विंटल उत्पादन मिळाले. तेव्हा वातावरण खूप खराब होते. त्यामुळे सर्वत्र करपा आला होता. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांनी आमचा प्लॉट मात्र करपामुक्त झाला होता.