'सिद्धीविनायक' शेवग्यामुळे सर्व पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याची प्रेरणा मिळाली

श्री. श्रीमंत संपत शिंदे,
मु.पो. तिरवंडे बु।।, ता. मोहोळ, जि. सोलापूर.
मो. नं. ७८७५५७५५७७


आम्ही १० महिन्यापूर्वी शेवगा लागवड केली. रोपे तयार करताना जर्मिनेटर औषधाची बियांवर प्रक्रिया केली. जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये शेवगा बियाणे ८ तास भिजवले व नंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत बियांची लागवड केली. पिशवीत एक भाग शेणखत, एक भाग वाळू व एक भाग माती या प्रकारे पिशवी भरली. रोपे दिड महिन्यांची झाल्यावर ८ x ८ फुटावर जमिनीत लागवड केली. त्याच्यानंतर ८ महिन्यानंतर शेवगा शेंगा तोडण्यास सुरुवात झाली. काही खताच्या चुकीच्या वापरामुळे सर्व झाडे एकसारखी वाढली नाही. शेवग्यावर अळी पडली होती. तेव्हा त्याच्यावर किडनाशक औषध फवारले.

४०० झाडांमध्ये साधारण १,००० किलो शेंगाचे उत्पादन झाले. याच्या अगोदर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी बद्दल माहिती नव्हती, त्यामुळे वापरत नव्हतो. पण जेव्हा शेवग्याचे उत्पादन चांगले आले म्हणून आता येथून पुढे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संपूर्ण माझ्या शेतीसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे.