दुष्काळी भागात 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिले भरघोस उत्पादन

श्री. उमेद जी. पाटील,
३४१ बी, शनिवार पेठ, पुणे -३८.
मो. नं. ९४०४७६९२२५


शिंदखेडा, जि. धुळे येथे मुळगावी मी २००३ मध्ये एक एकर मोरिंगा शेवगा लावला होता. रोपे स्वत: तयार केली. वरखते, पाणी व्यवस्थापन, छाटणी वगैरे सर्व सरांच्या तंत्रज्ञानाप्रमाणे केले तर ६ व्या महिन्यात उत्पादन चालू झाले. ५ टन माल पहिल्या बहारालाच मिळाला. सुरत, मुंबईला उडपी हॉटेलला स्वत: माल देत होतो. तेव्हा दोंडाईचा येथे मागणी नव्हती. तेव्हा सुरत आणि मुंबईला आठवड्यातून २ वेळा मागणी होत असे. एकावेळी १ क्विंटलपासून ५ क्विंटल पर्यंत शेवग्याच्या शेंगा पाठवित होतो. सुरुवातीला ५० रू. नंतर २० रू. पर्यंत त्याकाळी भाव मिळाला होता. हा शेवगा १ वर्ष सतत चालला. त्यानंतर मु. लाटवन, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी येथे माझे स्वत:च्या घराचे काम चालू झाल्याने शेवग्याकडे दुर्लक्ष झाले. नंतर मात्र ते पीक काढून टाकले.

त्यानंतर रत्नागिरीला घराजवळ याच शेवग्याचे १ झाड लावले. त्याचे उत्पादन चांगले मिळाले मात्र नंतर पाऊस व वाऱ्याने ते झाड मोडले. आता तेथेच नवीन लागवड १०० रोपांची करणार आहे व तेथील लोकांना या शेवग्याचे उत्पादन, आरोग्यविषयक महत्त्व याविषयी जागृती करणार आहे. त्यासाठी आज 'सिद्धीविनायक' शेवग्याचे १ पाकिट बी घेऊन जात आहे.