कारली १ एकर, खर्च ३० हजार, उत्पन्नन १।। लाख

श्री. होमदेवराव खोबे,
मु.पो. धोकार्डा, ता. हिंगणा, जि. नागपूर


मी एक सामान्य शेतकरी असून मला पिकांच्या अवस्था चांगल्याप्रकारे माहितआहेत . त्यामुळे दरवर्षी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतो. त्याच प्रमाणे मी कारली उत्पादन सुद्धा घेत असतो. मात्र गेले २ - ३ वर्षात व्हायरस व्हायरस या रोगाने कारली उत्पादक शेतकरी फार त्रस्त झाले आहेत. पण गेल्यावर्षी काही भागातील कारल्याचे चांगल्याप्रकारे उत्पादन झाले आणि व्हायरस पण कमी प्रमाणात आढळून आला. मग मी देखील यावर्षी कारले पीक लागवड करण्याचे ठरविले. १५ जुलै २०१६ रोजी १ एकरमध्ये यु.एस. जातीचे कारले ३ x १ फुटावर लावले. उगवणही बऱ्यापैकी झाली. तसेच पुर्वीच्या प्लॉटवर जो व्हायरस येत होता. तो आला नाही. कारल्याला ह्युमिक व ब्ल्यु कॉपरची ड्रेंचिंग केली. त्यानंतर आमच्या प्लॉटवर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. कुकडे (मो.नं. ७५०७५०३११७) हे आले. त्यांनी कारले प्लॉटची पाहणी केली आणि सांगितले वेलवर्गीय पिकांवर नागअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो आणि तो वेळीच आटोक्यात आला नाही तर प्लॉट वाया जातो. तेव्हा प्रतिबंधात्मक म्हणून तसेच पिकाच्या जोमदार वाढीसाठी काही औषधे लिहून दिली. ती म्हणजे रेस + थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + झिंक २० ग्रॅम हे प्रती पंपास घेऊन पहिली फवारणी केली. फवारणीनंतर तिसऱ्या दिवशी पिकामध्ये वाढ होत असल्याचे आढळले. तसेच पाने हिरवीगार रुंद व टवटवीत झाली. चांगला फरक जाणवत होता. त्यानंतर कुकडे यांना फोन करून माहिती दिली. २ - ३ दिवसांनी त्यांनी पुन्हा प्लॉटवर येऊन पिकाची पाहणी केली आणि दुसरी फवारणी थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + प्रिझम ३० मिली + हार्मोनी ३० मिली + स्प्लेंडर ३० मिली + स्ट्रेप्टोसायक्लिन यांची फवारणी केली असता या औषधांचा चांगल्याप्रकारे फायदा झाल्याचे जाणवले. नंतर कुकडे सरांच्या सल्ल्यानुसार नियमीत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या करू लागलो. त्यामुळे माझी कारली शेवटपर्यंत व्हायरसमुक्त राहिली. पहिलाच तोडा १० मण (४०० किलो) निघाला. त्याला १ हजार रु./मण (२५ रु. किलो) भाव मिळाला. पुढेही तोडे चांगल्याप्रकारे निघाले. माल उत्तम दर्जाचा असल्यामुळे भाव जादा मिळत होते. मला एकूण या १ एकर कारल्यापासून १।। लाख रुपये उत्पन्न मिळाले. यासाठी एकूण ३० हजार रु. खर्च आला. हे सर्व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे कमी खर्चात व्हायरसमुक्त कारली मिळून खात्रीशीर उत्पन्न मिळाले.