२ एकर पपई (७८६) १५ - १६ टन, ३ ते ३।। लाख अजून ५ - ७ टनाची आशा

श्री. संजय जनार्धन आवारे,
मु.पो. यरंडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर,
मो. ९८५०१४१४३५


माझ्याकडे २ एकर पपई पीक आहे. या पपईची लागवड १ मार्च २०१६ ला ५' x ६' वर केली आहे. त्यात १५ टन शेणखत वापरले आहे. माती परीक्षण केले आहे. त्यानुसार खते वापरली आहेत. लागवडीनंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, न्युट्राटोन वापरले तर माझ्या पपईची चांगलीच वाढ झाली. मला कंपनी प्रतिनिधी अमोल रुपवणे (मो. ८८०५३११४५४) यांनी पुर्णपणे मार्गदर्शन केले. ४ ते ५ महिन्यात पपईचा बहार धरला (फळे लागली) व त्यानंतर मी प्रोटेक्टंट वापरले आणि १५ दिवसांनी जर्मिनेटर ठिबकद्वारे सोडत राहिलो. त्यामुळे पीक जोमाने वाढले व पपईला चांगल्या प्रकारे बहार आला. फुल सेटींग चांगल्या प्रकारे होऊन फळधारणा झाली. या वेळेस फळधारणा झाल्यावर मी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, हार्मोनीची फवारणी केली. त्यामुळे व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहून फळांचे पोषण चांगल्या प्रकारे झाले.

पहिल्या तोडणीला ३ ते ४ टन पपई निघाली. त्यानंतर मी राईपरन + न्युट्राटोन यांची फवारणी नियमित केली. माझ्या पिकावर कोणत्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. मी फवारणीतून सप्तामृतचा वापर केला आणि जमिनीतून विद्राव्य खत टाकले आहे. १ किलो पपईला १८ ते २५ रुपयापर्यंत भाव मिळाला. दुसरी काढणी केली तेव्हा ५ ते ६ टन उत्पादन मिळाले. त्याला सुद्धा चांगला भाव मिळाला. तसेच जमिनीतून जर्मिनेटरची आळवणी दरमहा चालूच होती. नंतर तिसऱ्या काढणीला ६ ते ८ टन फळ निघाले असे करून मला एकंदरीत २ एकरातून १५ ते १६ टन माल निघाला. त्याचे एकूण आतापर्यंत ३ ते ३।। लाख रुपये झाले. अजूनही ५ ते ७ टन माल निघणार अशी आशा आहे. मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या प्रतिनिधींच्या योग्य मार्गदर्शनाने व या तंत्रज्ञानाचा वेळच्यावेळी वापर केल्यानेच हे शक्य झाले.