पाऊस पडूनही सोयाबीनची फुलगळ नाही, म्हणून तूर, पपई, ऊसासही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी

श्री. राहुल रामराव कदम,
मु.पो. जयगाव, ता. परळी (वै.), जि. बीड.
मो. ९८५००५१५०९


माझ्याकडे एकूण १५ एकर शेती आहे. त्यामध्ये बोअरवेल असून शेती ओलीताखाली आहे. परंतु गेली २ - ३ वर्ष पाऊस अपुरा पडत असल्यामुळे बागायती पिके ऊस, केळी व कापूस ही जवळपास घेवूच शकत नाही. मग कोरडवाहू कापूस केला तर मजुराचा प्रश्न उद्भवतो. या सर्व गोष्टीला पर्याय म्हणून सोयाबीन या पिकाची निवड करून लागवड करण्याचे ठरविले.

एकूण ५ एकर क्षेत्रावर ग्रिनगोल्ड जे.एस.३३५ हे वाण पेरण्याचे ठरविले. तेवढ्यात मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी कंपनी प्रतिनिधी श्री. बुरंगे (मो. ८३०८८५१३८८) भेटले. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सोयाबीन पिकसाठीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून ५ एकर सोयाबीन पैकी किमान २ एकर सोयाबीन क्षेत्राला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला. मग प्रयोगादाखल त्या २ एकर क्षेत्राला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले. प्रथम २ एकर क्षेत्राला कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा टाकल्या. बियाला जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केली. एकरी ३० किलो बियाणे लागले. जर्मिनेटरची बीज प्रक्रिया केल्यामुळे ९९% उगवण क्षमता झाली. उगवलेल्या मोडाची सुरूवातीच्या काळामध्ये वाढ चांगली झाली. नंतर पहिली पंचामृताची फवारणी फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये असताना केली व नंतर दुसरी फवारणी २२ दिवसांनी केली. तसेच आळी नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% इ.सी. १० ग्रॅम ने घेतले.

मधल्या काळामध्ये पाऊस सतत लागून राहिल्यामुळे बाकीच्या ३ एकर क्षेत्रावरील सोयाबीनची फुलगळ झाली. शेंगांची सेटींगही झाली नाही. परंतु डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या क्षेत्रावर त्याचा काहीही दुष्परिणाम झाला नाही. शेंगा एकसमान लागल्या व सोयाबीनची क्वॉलिटी सुधारली. मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या २ एकर क्षेत्रामध्ये एकरी १३ क्विंटलचा उतारा मिळाला व अन्य ३ एकरमध्ये एकरी ११ क्विंटलचा उतारा मिळाला. त्यामुळे यापुढेही मी तुर, पपई, ऊस या पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.