दलाल आमची फळे गाळ्यावरील आलेल्या शेतकऱ्यांना डाळिंबाचे ग्लेजिंग दाखविण्यासाठी फळे हातात घेऊन दाखवत असत

श्री. आत्माराम तुळशीराम नेवसे (नेव्ही रिटायर्ड),
मु. पो. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा, ४१२८०१.
मोबा. ९२२४०३७७३७मी नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर घरची शेती करू लागलो. प्रथम ऑक्टोबर २००८ मध्ये १००० भगवा डाळींबाची रोपे लावली. जमीन माळरानाची मुरमाड आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०० ९ मध्ये भगवा २७०० आणि सप्टेंबर २०१० मध्ये १६०० झाडे लावली आहेत.

लागवडीतील अंतर १५' x १२' आणि १५' x १०' असे आहे.

कल्पतरू सेंद्रिय खत लागवडीच्यावेळी प्रत्येक रोपास २५० ग्रॅम दिले होते. झाडांना वेळच्यावेळी सरांच्या सल्ल्यानुसार दर १ ते २ महिन्याला नियमित जर्मिनेटरचे ड्रेंचिंग करत होतो. सप्तामृताच्या फवारण्या हवामानातील बदलानुसार करत होतो.

या तंत्रज्ञानामुळे बागा पुर्णपणे निरोगी राहून १८ महिन्यात बहार धरण्यायोग्य ३ ते ४ फूट उंचीच्या घेरदार तयार झाल्या.

गेल्यावर्षी सुरुवातीला लावलेल्या १ हजार झाडांचा दुसरा बहार आणि २७०० झाडांचा पहिला बहार जानेवारी २०१० मध्ये धरला होता. दुसऱ्या बहाराच्या एक हजार झाडांवर १०० फळे आणि पहिल्या बहाराच्या २७०० झाडांवर ४० फळे धरली होती. फळे साधारण चिकूच्या आकाराची असताना डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या सप्तामृता ची सरांच्या सल्ल्यानुसार फवारणी केली. नंतर फळे पेरूच्या आकाराची झाल्यानंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी १ लि. आणि न्युट्राटोन, राईपनर प्रत्येकी ७५० मिलीची २०० लि. पाण्यातून याप्रमाणे फवारणी केली, त्यामुळे फळांची आठवड्याच्या आत फुगवण होऊन सालीला लालभडक कलर आला. फळे श्री. मारणे यांच्या गाळ्यावर पुणे मार्केटला विक्रीस आणली होती, तर तेथील व्यापारी फळांचे ग्लेजिंग (आकर्षक चमक) पाहून फळे हातात घेऊन इतरांना दाखवत होते. कारण त्यादिवशी मार्केटमध्ये एक नंबरची फळे फक्त आमचीच होती.

गेल्यावर्षी आताच्या तुलनेत भाव कमी होते तरी त्यावेळेचा एक नंबर ५० ते ७५ रू. किलो भाव आम्हाला मिळाला. सरासरी ६० रू. किलो भाव मिळाला.

अर्ध्या किलोमीटरवर तेल्या, पण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आमच्या बागा मुक्त

चालूवर्षी या दोन्ही बागांचा आंबे बहार धरला आहे. फळे साधारण १५० ते ३०० ग्रॅम वजनाची आहेत. आमच्या भागातील अर्ध्या कि. मी. अंतरावरील डाळींब बागांवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचा प्रादुर्भाव आपल्या बागेवर होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक इलाज करण्यासाठी सरांचा सल्ला व तंत्रज्ञान घेण्यासा आज (३१ मे २०११) आलो आहे.

आमची निरोगी बाग पाहून आमच्या शेजारचे श्री. दादासो रामू नेवसे (मोबा. ९८२२९०७७००) हे देखील त्यांच्या नोव्हेंबर २००७ मध्ये लावलेल्या ५०० झाडांवर आणि नोव्हेंबर २०० ९ मध्ये लावलेल्या २००० झाडांवर तंत्रज्ञान वापरण्यासाठी सरांचा सल्ला घेण्यास आले आहेत.

हे उत्पादन घेण्यामध्ये मला माझ्या पुतण्याचे श्री. अशोक बबन नेवसे (बी. एस्सी. अॅग्री) मार्गदर्शन मिळते.

आज तोही सरांचा सल्ला घेण्यास आला आहे.

ता. क. - आज २ जून २०११ रोजी तेल्या रोगास प्रतिबंध होण्यासाठी तसेच फळांचे पोषण होऊन गेल्यावर्षीप्रमाणे मालास आकर्षक चमक येण्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १० लिटर आणि प्रोटेक्टंट १० किलो घेऊन जात आहे. हार्मोनी शिल्लक आहे. आमच्याप्रमाणे श्री. दादासो नेवसे यांनी त्यांच्या नोव्हेंबर २००७ मध्ये लावलेल्या ५०० आणि नोव्हेंबर २००९ मध्ये लावलेल्या २००० भगवा डाळींबाच्या झाडांवर हे तंत्रज्ञाना वापरण्यासाठी सप्तामृत प्रत्येकी १० लिटर आणि हार्मोनी २ लिटर घेतले आहे.