गेलेल्या शेवग्याच्या प्लॉटपासून १ लाख ८० हजार केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने

सौ. निकीता पंकज शिंदे,
मु. पो. सांगवी, ता. बारामती , जि. पुणे,
मोबा. ९८२२१९५१३५


आम्ही ३ वर्षापूर्वी भारी काळ्या जमिनीत कोईमतूर शेवग्याची लागवड १० x १० फुटावर केलेली आहे. २ वर्षापूर्वी त्या झाडांना फुले लागत नव्हती. माल लागत नव्हता, म्हणून प्लॉट काढून टाकणार होतो. मात्र त्याचा काळात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीचे पुस्तक वाचण्यात आले त्यावरून नोव्हेंबर २००९ मध्ये सरांची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सप्तामृताच्या फवारण्या केल्या, तर त्या वर्षी ५॥ टन माल निघाला होता. सरासरी ३०० ते ४०० रू./१० किलो भाव मिळाला. काही वेळा कमीत कमी २०० ते जास्तीत - जास्त ५०० रू. पर्यंत भाव मिळाला. गेल्यावर्षी १ लाख ८० हजार रू. या एक एकरात झाले.

या अनुभवातून चालू बहाराला दर १५ दिवसाला सप्तामृत फवारणी घेत आहे. कारण यावेळी हवामान फारच प्रतिकुल होते. सेटिंग होत नव्हते. कळी निघत नव्हती. पानगळ घेत होती. ढगाळ वातावरणाने अळी, करपा, लालकोळी असे प्रादुर्भाव वाढू लागले. खोड पोखरणारी अळी यांचा ही प्रादुर्भाव होता. यावर सरांचा फोन करून सल्ला घेतला.

खराब हवामानातही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची साथ प्लॉट उत्तम

हवामान खराब असल्याने यावेळी खूप फवारण्या घेतल्या आहेत. दर १५ दिवसाला सप्तामृत फवारत आहे. त्याचा चांगला फायदा झाला. नियमित फवारण्यामुळे प्लॉट पुन्हा गेल्यावर्षीप्रमाणे बहारात आला. फेब्रुवारी अखेरीस शेंगा चालू झाल्या. फुलकळी वाढली. झाडावर १५० ते २०० शेंगा लागल्या. तोडा दररोज, तर कधी दिवसाड करतो. ८० ते १४० किलोपर्यंत शेंगा मिळतात. हा शेवगा बारामती मार्केटयार्डमध्ये श्री. सुनिल बनकर यांचे गाळ्यावर १ नंबरने विकला जातो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे शेंगेला ताजापणा, कडकपणा, चमक येते.

शेंगावर कुठलाही डाग नाही, रोग नाही, आकर्षक चमक असल्याने १ नं. भावात मालाची विक्री होते. दुसऱ्यांचा शेवगा जेव्हा ८० ते १०० रू. किलो विकला जातो. अशा परिस्थितीत आमचा शेवगा १५० रू. १० किलोपेक्षा कमी भावात कधीच विकला नाही. सरासरी २०० ते २५० रू. भाव मिळाला. आता ३०० रू. पर्यंत भाव मिळत आहे. अजून नवीन सेटिंग होत आहे, लहान शेंगाही आहेत. अजून १५ दिवस माल चालेल. पुढे पाऊस झाल्यावर फुलगळ होत असल्याने सेटिंग होत नाही. तरी सर्वसाधारण या प्लॉटपासून आतापर्यंत ७० ते ८० हजार रू. चा माल विकला आहे.

खोडवा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने २ महिन्यात ४'

८६०३२ उसाचा खोडवा अर्धा एकरमध्ये आहे. मार्च अखेरीस तोडणी केली तेव्हा २३ टन उत्पदान मिळाले. त्यानंतर खोडवा दीड महिन्याचा असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची एक फवारणी आणि दुसरी ३ ते ४ महिन्याचा असताना केली. तर दोन सव्वा दोन महिन्यात खोडवा ऊस ४ फूट उंचीचा झाला आहे. हा ऊस पाहून लोक म्हणतात हा लागणीचा ऊस असावा. त्याला सुपर फॉस्फेट दोन बॅगा आणि युरियाची एक बॅग दिली होती. सप्तामृताच्या फवारणीमुळे पाणी उशीरा दिले गेल्यावर जमिनीला भेगा जरी पडल्या तरी उसाची पाने एकदम हिरवीगार राहतात.