२० गुंठे भुईमूग - खर्च ५ हजार - निव्वळ नफा ६० हजार

श्री. बिरू रामचंद्र कोळेकर,
मु.पो. कासेगाव, ता. पंढरपूर, जि.सोलापूर .
मोबा.९९७५८१४९३३



नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी साधारणत: १५ फेब्रुवारी २०१२ ला वेस्टर्न महाबली या भुईमुगाच्या जातीची लागवड केली. मनात भीती होती की, एवढे महाग बी (१५० रू./किलो) त्याचे व्यवस्थापन आपल्याद्वारे होईल की नाही. पण श्री. यादव व्यवस्थापन आपल्याद्वारे होईल की नाही. पण श्री. यादव यांनी मला शब्द दिला, "काही घाबरू नका, आपला भुईमूग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकदम जोरदार आणू," मग तयारीला लागलो. प्रथम शेणखत टाकले व नंतर २० गुंठ्याला कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५ बॅगा टाकल्या. रान कृषी वेटरने लोटरले (जमीन भुसभुशीत केली) व नंतर त्या रानात साधारणत: ५ फुटावर बोध तयार केले. त्यावर इनलाईन ड्रीप पसरले व लागण १ फुटावर ४ बिया अशी केली. लागवडीपूर्वी बोध ओला केला होता. त्यानंतर जर्मिनेटर व प्रोटेक्टंटची बीजप्रक्रिया केली. त्यामुळे उगवण १००% झाली. भुईमूग ४ पानवर आल्यावर त्याला जर्मिनेटर, थ्राईवर व क्रॉंपशाईनरचा फवारा दिला. त्यामुळे भुईमूग फलफलू(चांगल्याप्रकारे पसरू/ वाढू) लागला.

शेतकरी बांधवांनो भुईमुगाला मर रोग सर्वात जास्त त्रास देतो. त्यासाठी आम्ही जर्मिनेटर , प्रिझम व प्रोटेक्टंट ड्रीपमधून सोडले. त्यामुळे अजिबात मर रोग आल नाही. श्री. अमित यादव यांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे कोल्हापूर भागातील भुईमूग आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कासेगावमध्ये यशस्वी केला. आता आमच्या प्रत्येक वेलीला साधारणत: ३०० ते ४०० ग्रॅम ओली शेंग निघत आहे. एकरात १५ क्विंटल वाळलेली शेंग निघेल. तर सध्याच्या बाजारभावानुसार त्याचे ६५ हजार रू. होतील असा अंदाज आहे. सगळा खर्च ५ हजार रू. आला. हे सगळे केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व श्री. अमित यादव यांच्यामुळे यशस्वी झाले. यापुढे मी द्राक्षबागेसाठीदेखील हे तंत्रज्ञान वापरणार आहे.