डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर कमी असतानाही सातत्याने अधिक उत्पादन

श्री. पांडुरंग भिमराव माने,
मु. पो. जाखले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
मोबा. ९०११३५३६५४मी गेल्या चार वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी(अग्रो) प्रा. लि. या कपंनीच्या औषधांचा वापर सगळ्या पिकांना करतो. श्री. विलास चौधरी कोल्हापूर सेंटरचे प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीला जिप्सी काकडीचे बी जर्मिनेटर २५ मिलीच्या द्रावणात ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर लागवड केली. त्यामुळे बियाणांची उगवण ९७% झाली. नंतर एकरी २ लि. जर्मिनेटर + २०० लि. पाणी याप्रमाणे द्रावण करून आळवणी (ड्रेंचिंग) केली. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर वाढली. वेलाची वाढ जोमाने झाली. बुंध्यापासूनच फुटवा भरपूर निघायला सुरूवात झाली. त्यामुळे काकडीच्या फळांची संख्या भरपूर वाढली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी (अग्रो) प्रा. लि. चे जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉंपशाईनर + न्युट्राटोन + प्रोटेक्टंट-पी फवारणीतून वापरल्यामुळे झाड निरोगी राहते. फुलगळ थांबते, फुलांची संख्या भरपूर वाढले, फुटवा व माल जास्त निघतो. या सर्व औषधांचा वेळच्यावेळी फवारण्या घेत असल्यामुळे , नागअळी, लाल भुंगे, फळमाशी, भुरी, केवडा, करपा या कीड - रोगांचा अजिबात प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे पीक एकदम निरोगी आहे. असा८० गुंठ्याचा प्लॉट आहे. वेळ वाढीसाठी मांडव केला आहे.

काकडीची लागण २८ एप्रिल २०१२ रोजी केली. जर्मिनेटची आळवणी केली, त्यानंतर पाच दिवसांनी २ एकराला डी.ए.पी. ४ पोती + + पोटेश २ पोती + युरिया १ पोते + निंबोळी पेंड ४ पोती + कल्पतरू सेंद्रिय खत ५ पोती असे सर्व एकत्र करून भेसळ डोस रोपाच्या अर्धा चंद्र गोल पद्धतीने बुजवून घातला, त्यानंतर दर पंधरा दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या फवारण्या घेत होतो, तार काठी केली, सर्व वेळ तारेवर चढवले. त्यानंतर प्रथम फुलकळी दिसताच water सोल्युबल चालू केले. जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी + १२:०:६१-४ किलो + ०:०:५०-२ किलो एकरी दिले. परत एक दिवस आड ०:५२:३४ - ६ किलो परत एक दिवस आड १३:०:४५- ६ किलो दिले, परत एक दिवस आड बोरॉन अर्धा किलो + रिंगझोलीन अर्धा किलो+ केल्शियम नायट्रेट ८ किलो अशी अलटून पलटून वॉटर सोल्युबलची खते दिली.

आज अखेर काकडीचे उत्पादन ३५ टन मिळाले आहे. काकडीचा प्लॉट पुर्णत: निरोगी असून अजून काकडीचे तोडे चालू आहेत. (संदर्भ - कव्हरवरील फोटो) २० मजुराच्या सहाय्याने एक दिवस आड अशी काकडीची तोडणी करतो. सरासरी १३० डाग तोड्याला निघतात. एकून ५ ॥ टन माल निघतो. हा सर्व माल संधामार्फत मुंबई मार्केटला पाठवतो. वाहतुक + कमिशन + तोलाई + हमाली वजा जात सध्या सरासरी १० रू. प्रमाणे प्रति किलो दर मिळत आहे. ठरली. त्याबद्दल सरांना धन्यवाद देतो.