रोगट काकडी सुधारून नाशिक मार्केटला ३०० ते ४०० रू./१० किलो

श्री. युवराज जयराम बाऱ्हे, मु.पो. बोरवठ, ता. पेठ, जि. नाशिक - ४२२२०८, मोबा. ९६०४१८१५८५



आम्ही गेली ३ ते ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन ) चा वापर काकडी, वांगी, ढोबळी मिरची या पिकांवर करीत आहे. या औषधांमुळे प्रतिकुल हंगामातही पिकाची वाढ होते. रोग - किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो.

दोन वर्षापुर्वी काकडीला जबरदस्त रिझल्ट मिळाला. आम्ही १५ मे २००९ ला १० गुंठ्यामध्ये काकडी लावली होती. या काकडीला नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या घेत असल्याने ४० दिवसात तोडा सुरू झाला. तोडे चालू असतानाच मध्यंतरी प्रतिकुल हवामान असताना फवारणीस उशीर झाला. तर त्याचा परिणाम वेलीच्या शेंड्यावर झाला. वेळ शेंड्याकडे पिवळसर होवून सुकू लागल्याने पूर्ण प्लॉट वाया जातो की काय? असे वाटत होते. तेव्हा ताबडतोब सप्तामृताची फवारणी प्रत्येकी ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून घेतली असताना पिवळेपणा थांबून शेंडा वाढ सुरू झाली. फुलकळीही जोरात सुरू होवून पुन्हा माल लागण्यास सुरुवात झाली. म्हणून लगेच सुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली आणि राईपनर ३०० मिलीची १०० लि. पाण्यातून केली. आम्ही तोडे २ ते ४ दिवसाआड करत होतो. माल ५० ते ९० किलो निघत होता. नाशिक मार्केटला ३०० ते ४०० रू. १० किलो दराने आमच्या मालाची विक्री झाली व त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

या अनुभावरून आम्ही आता वांग्याची लागवड करणार आहे. त्याला सुद्धा डॉ.बावसकर सरांच्या सप्तामृताची फवारणी करणार आहे.