दुष्काळाने होरपळलेल्या १ एकर उसाचे ५२ टन उत्पादन

डॉ. पंकज शिंदे,
मु.पो. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे.
फोन नं.(०२११२) २६ ५४९८
मो. ९८२२१९५१३५ / ९८९०५७८३१५


आम्ही १ एकरमध्ये ८६०३२ उसाची लागवड ऑगस्ट २०११ मध्ये केली होती. जमीन भारी काळी असून पाणी कॅनॉल आणि विहीरीचे देत होतो. मात्र त्यावर्षी पाऊस न झाल्याने विहीरीचे पाणी कमी झाले. त्यातच कॅनॉलचे पाणी बंद केल्याने भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या उसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सुरुवातीस जर्मिनेटर, थ्राईवर, प्रोटेक्टंटच्या ३ फवारण्या केल्या होत्या. उगवण झाल्यावर एकदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत फवारल्यामुळे फुटवा भरपूर झाला होता. १०:२६:२६ ची ४ पोती, युरीया २ बॅगा, १८:४६ च्या २ बॅगा २ वेळेस विभागून दिल्या होत्या. त्यावर्षी पाऊस कमी पडला, त्यामुळे सगळा वाळून गेला होता. उंची छातीएवढीच होती. फक्त शेंडा हिरवा होता. नंतर २०१२ मधील पाऊस झाल्यावर थोडा हिरवळला. त्यानंतर लहान पेऱ्या सुटून २ फूट वाढला, कारण अगोदर उसाची वाढ पाण्याअभावी खुंटली होती. जमिनीला पुर्ण भेगा पडल्या होत्या. तशा उसाचे एकरी ५२ टन उत्पादन मिळाले. हा ऊस फेब्रुवारी २०१३ मध्ये तुटला. माळेगाव कारखान्याला दिला. पहिला ह्त्पा २२०० रू. टनाप्रमाणे दिला असून अजून ३०० रू. चा तरी फरक मिळेल. पाणी असते तर ९० टनापेक्षा जास्त उत्पादन निश्चित मिळाले असते. शेजारी दुष्काळात होरपळलेल्या एक एकरात २० -२५ टन देखील उत्पादन त्यावेळी निघत नसे. जेथे पानायची सोय होती तेथे सरासरी २५ -३० टन उत्पादन त्या भागात मिळाले.

सध्या खोडवा एवढा जबरदस्त फुटला आहे की, लोकांच्या लागणीचा ऊसही तसा नाही. कांद्याच्या पातीसारखी हिरवीगार पाने आहेत. २॥ - ३ महिन्याच्या खोडव्याला अजून काहीच वापरले नाही. पाऊस झाल्यानंतरच खर्च करणार आहे.

माळरानावर डाळींब यशस्वी!

निमगाव केतकी (ता. इंदापूर) ला ५ एकर माळरानाची जमीन आहे. त्यामध्ये भगवा डाळींब नोव्हेंबर २०११ मध्ये लावले आहे. लागवड १३ x ९ फुटावर असून बागेस विहीर व शेततळे आहे. ऊस, शेवगा या पिकांबरोबर याला सरांच्या सल्ल्यानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे.

चालूवर्षी जानेवारीत झाडे १५ महिन्याची लहान असल्याने बहार धरण्याचा विचार नव्हता. मात्र आपोआपच कळी निघू लागल्यावर छाटणी न करता किंवा खताचा डोस (बहार धरण्यापुर्वीचा) न देत कळी राखली. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या आतापर्यंत २ फवारण्या केल्या आहेत. सध्या झाडांवर ७० ते १०० -१३० पर्यंत फळे आहेत. ज्या झाडांवर जादा फळे आहेत. तेथे १५० ग्रॅमच्या आसपास साईज आहे. तर इतर झाडांवर २०० ग्रॅम वजनाची फळे आहेत. उन्हाळा असल्याने रोग - किडीचा प्रादुर्भाव कमी होता. त्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिबंधात्मक फवारण्या केल्याने कीड व बुरशीनाशकाच्या फवारण्या करण्याची वेळ आली नाही.

फळे काढणीस १।। महिना अवधी आहे. तोपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या अजून २ फवारण्या करणार आहे. म्हणजे फळांचे पोषणाबरोबरच फळांना कलर येऊन फळांचा दर्जा सुधारून उत्पादन व भाव अधिक मिळेल.