३० गुंठ्यात सोयाबीन १५ क्विंटल

श्री. गजानन संताजी पाटील,
मु. पो. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर.
मोबा. ९३७३३३४३५९


मी पुण्यामध्ये टेलीकम्युनिकेशन कंपनीत बोपोडी (पुणे) येथे नोकरी करीत असून गेल्यावर्षी किसान प्रदर्शन २०१२ मध्ये 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरून मासिक चालू केले. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची माहिती घेऊन तंत्रज्ञान घेऊन गेलो होतो. माझी शेती उत्तूर येथे गावी असून अर्धोलीने दिली आहे. त्यामध्ये सोयाबीन, ऊस ही पिके घेतो.

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची माहिती १॥ वर्षापुर्वीच मिळाली होती. त्यानुसार प्रथम सोयाबीन जून २०१२ मध्ये १ एकर काळ्या कसदार जमिनीत टोकला. आमच्या भागात पाऊस जादा होत असल्याने उसाची रुंद सरी काढून वरंब्यावर सोयाबीनचे दाणे टोकले. त्यामुळे जादा पाणी सरीतून निघून जात होते.

सोयाबीन २० किलो बियाणे ३० गुंठ्यामध्ये टोकताना प्रथम जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण १००% झाली होती. त्यानंतर 'कृषीविज्ञान' मासिकात दिल्याप्रमाणे सप्तामृत औषधांच्या नियमित ४ फवारण्या केल्या. याला युरियाचा १ डोस दिला होता आणि शेणखत वापरले होते. पाण्याची पाळी एकही न देता नुसत्या पावसाच्या पाण्यावर या ३० गुंठ्यातून १५ क्विंटल उत्पादन डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने मिळाले. सोयाबीनचा दर्जादेखील उत्तम होता. त्यावेळी ४ हजार रू. क्विंटल दर होता. भाव त्यामानाने कमी वाटत होता म्हणून अद्याप विक्री केली नाही. तो आता (जून २०१३) विकणार आहे.

सोयबीननंतर त्याच वरंब्यावर कांदा मध्यम कांदा दर मिळाला १८ रू. किलो

सोयाबीन काढल्यावर त्याच वरंब्यावर कांदा लावला. कांद्याला ३ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या केल्या. तर कांदा हातात बसेना असा मोठा तयार झाला. कांदा पहिल्यांदाच केला होता. त्यामुळे विक्री करणे नीट जमले नाही. कारण कांदा काठणी करताना पातीचे देठ जादा (१ इंचापर्यंत) राहिले होते. त्यामुळे भाव २ - ३ रू. किलोमागे कमी मिळत होता. तरी १८ रू./ किलो भाव मिळाला. या कांद्यापासून २० हजार रू. मिळाले. कांदा वरंब्याला असतानाच ऑक्टोबर २०१२ मध्ये सरीमध्ये ८६०३२ उसाची लागण केली होती. याला २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या. सध्या ऊस जोमदार आहे.

६ महिन्याचा ऊस वाटतो ८ - १० महिन्याचा

यापुर्वीच्या १ एकर असला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ - ३ फवारण्या केल्या होत्या आणि कल्पतरू वापरले होते. त्यामुळे उसाची वाढ अधिक झाली होती. ६ महिन्याचा ऊस ८ ते १० महिन्याचा असल्यासारखा वाटत होता.

एकरात ६० टन उत्पादन सहज मिळाले असते, मात्र ऑक्टोबर २०१२ मध्ये जोरात पाऊस पडल्याने आणि जमीन भारी काळी असल्याने ऊस (लोळला) पडला. नंतर उंदीर लागला. त्यामुळे मातीचे ढीग तयार झाल्याने पुढील काळात पाणी निट बसेना. ऊस पडल्याने आत जाता येत नव्हते, त्यामुळे एवढा चांगला ऊस असतानाही उत्पादन ४० टन मिळाले.