डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संशोधनावरील एक चिंतन !

श्री. राजेंद्र रामभाऊ पालकर
, जायकवाडी वसाहत रोड, हरीओम प्रोव्हीजन, वडी गोद्री, ता. अबंड, जि. जालना
मोबा. ९४२१६४९१४१/८३०८५७५३४१


आदरणीय,

डॉ. वि. सु. बावसकर, शत:कोटी प्रणाम !

(कोटी हा शब्द संख्यांक नाही)

महाराष्ट्रातील तमाम विज्ञानधिष्ठीत ज्ञात व अज्ञात शेतकऱ्यांकडून मी विनम्रतेनं नतमस्तक होऊन अभिवादन करतो… त्याचा स्विकार करावा.

आपले शोध कार्य, शोध प्रणाली व तत्सम चिकीत्सक प्रवृत्ती, त्या बद्दलची जिज्ञासु वृत्ती व त्यामागील आस्था, न संपणारी प्रेरणा व त्यातून निर्माण होणारा सत्संग अशा एकना अनेक गुंतागुंतीच्या जीवन प्रवाहाचे वास्तव मी स्वत:च्या डोळ्यांनी न बघताही आपल्या अमृतमुल्य " कृषी विज्ञान" च्या माध्यमाच्या संत कृषी साहित्यातून प्रेरीत होऊन त्यातून तुमचा जीवन प्रवाह प्रगत होतो. ते बघण्यासाठी वा अनुभवण्यासाठी एका दिव्य चक्षुंची गरज असावी लागते. ती ज्यांना प्राप्त झाली आहे त्यांना हे समजले व ज्यांना समजले त्यांना ते उमजले व त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले, त्यांनी ते प्रतिबिंबीत केले असेल ! असे अनके कृषक बांधव आपल्याशी जुळले गेलेले आपण अनुभवले असेलच अशी अपेक्षा.

मी संत हा शब्दप्रयोग केल्यानंतर आपणास कदाचित डॉक्टर ह्या नात्यानं विचलीत किंवा आश्चर्यचकीत झाला असाल ! तर ती माझी स्वत:ची एक समजुत आहे, असे समजावे ?

कारण संताची व्याख्या ज्यानं त्यानं स्वत:च्या सोयीची करून/समजून घेतली असावी असे मला वाटते.

वास्तविक स्वत:च्या भौतिक, पारिवारीक, सामाजिक, "संसाराचा" विचार न करता "समाजाचे हित" नेमके शोधणारी मंडळी म्हणजे संत. अशी व्याख्या जनमानसात त्याबद्दल रूढ झालेली आहे, असे समजावे ? म्हणजे वास्तववाद त्याच्याही पुढे जाऊन शास्त्र या शब्दाची संधी केली तर त्याच्याशी निगडीत पुर्ण मार्ग काढून त्यांची चिकीत्सा करून त्याच्या गोपनियतेपर्यंत जाऊन ऐहिक व आदी भौतिक यांचा श्रेष्ठ समन्वय, साधत सुवर्णमध्य काढून (जो काढण्यासाठी मानसाची हयात जाते व ज्यावेळेस हे समजते तोपर्यंत तो चिरनिद्रा घेत पडलेला असतो.) तो पुढे सांगण्यासाठी उरतच नाही असे अनेक जन्म जरी झाले. तरी ज्ञान पुढे जात नाही. म्हणून त्याचा काढलेला शास्त्रार्थ जनमानसापुढे तेवढ्याच दृढ निश्चयाने मांडतो. त्याचे व्यवस्थित सादरीकरण करतो तो म्हणजे "शास्त्रज्ञ" व पारमार्थिक भाषेमध्ये संत होय! निश्चितपणे, ठामपणे, नव्हे - नव्हे कृतज्ञपणे हे शास्त्रज्ञ संतच होत.

संताचे व शास्त्रज्ञांचं जीवन प्रत्येकानं जवळून बधावं, ते अनुभवाव, त्यावर चिंतन, मनन करावं व त्याचा वैचारिक स्विकार करावा. त्याचा प्रत्यक्ष कार्यानुभव घ्यावा. त्याचं जीवन दैदीप्यमान बनेल यात यतकींचीतही शंका नाही. फार पुर्वी भारत कृषी प्रधान होता व आज कृषक प्रधान झाला आहे, असे म्हणावे लागते.

फार पुर्वी ज्यावेळेस सुसंस्कृत समाज उदयाला आला, त्यावेळेस समाज रचना करणारांनी 'पुरूषप्रधान' पौरूष्यप्राधान्यं अशा संकल्पीत समाज व्यास्था निर्माण केली व आज ती 'अतिपुरूषप्रधान' अशी 'अपभ्रौंशीत' झाली आहे. त्याचे परिणाम आज आपण पाहतो आहे. त्याचप्रमाणे 'कृषीप्रधान' भारतामध्ये शेतकऱ्यांनी स्वयंपुर्णतेचि संकल्पना होती ती आज पूर्ण मोडीत काढून सर्व निकष बदलून अर्थिक निकषांवर आधारीत करून काही कौटुंबिक मुल्यांना हद्दपार करून व्यापारीकरणाच्या नावावर एकमेकांचे (वास्तविक काहीजणच सर्व शेतकऱ्यांचे) शोषण करत आहेत. यांच्याकडे जाणून बुजून डोळे झाक करत आहेत व मृगजळाच्या पाठीमागे पळत सुटले आहेत, असो.

उत्तम शेती ही कधीच मोडून त्याऐवजी उत्तम नोकरी अशी बिरुदावली मिरवत आहे, असे आपण सर्रास पाहतो आहे. अतिशय गंभीर व सर्वांना खिन्न करणारा प्रघात कसा बदलणार ? आपण आपले जीवन यावर समर्पित केले आहे, असे दिसते. कारण 'शेवगा' म्हणावं तेवढी राजाश्रय नसलेली, समाजातून ठोकरली गेलेली काही गुणांसाठी परसाच्या बाहेर फेकली गेलेली व अतिशय दुर्लक्षित अशी ही वनस्पती मानवासाठी किती उपयुक्त आहे याचे विवेचन, चिंतन, अभ्यास करून समाजाच्या मानसिकतेत बदल करून त्याला लागवडीस प्रवृत्त करणे ही गोष्ट म्हणजे सोपी नाहीये. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊन त्यात मार्क मिळवायचे हे सर्वसामान्यांचे काम नाही ?

शतकोत्तरापासून चालत आलेले प्रघात वास्तविक ज्यांनी जे रूढ केले, त्यांची संकल्पना अगदी सत्य होती व आहे. परंतु त्यांचे काहीच शब्द पाळले गेले व त्यांची विशेषनं गाळली (गाडली) गेली व अर्थाचा अनर्थ काढून त्या प्रजातीचे पुर्णपणे उच्चाटन करण्यात आले हे ही विशेष. फक्त सांगोवांगीच. याचे रूढीकरण झाले ब्रम्हगण समजणाऱ्यांनी जसे वास्तुशाश्त्र रूढ केले त्याची कारणमिमांसा लिहून ठेवली नाही. सत्य लोकांपासून दूर करून आपापल्या स्वार्थी पोळ्या भाजण्याचे काम ज्यांनी केले त्यांनी समाज दोष पत्करला व समाजाची खूप मोठी हानी त्यापासून झाली, ती कधी भरणार ?
दैव जाणे इती.
योगायोगाने भेट झालीच तर उर्वरित बरेच काही, तुर्त तरी स्वल्पविराम,

आपला स्नेहांकित,

श्री. राजेंद्र रामभाऊ पालकर

जायकवाडी वसाहत रोड, हरीओम प्रोव्हीजन

वडी गोद्री, ता. अबंड, जि. जालना

मोबा. ९४२१६४९१४१/८३०८५७५३४१