नोकरीमुळे दुर्लक्षित शेतीतून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने चांगले उत्पादन दर्जा मिळण्याचा एक मोठा आशावाद !

श्री. सुरेश पांडुरंग जाधव,
मु. आवाशी, पो. टांगर, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
मोबा. ९२२१५४५३७१


मी स्टेट ब्रँक ऑफ इंडिया (बोरीवली) मुंबई येथून २०१० ला निवृत्त झालो आहे. अगोदरच शेतीची आवड असल्याने आमच्या १२ एकर जमिनीमध्ये नारळ, काजू घेत असे. काजू वेंगुर्ला - ७ ची १२०० झाडे १५ ' x १५ ' वर लावलेली आहेत. त्यातील ४०० झाडे १७ वर्षापुर्वीची असून ८०० झाडे ४ वर्षापुर्वी लावली आहेत. सुपारी श्रीवर्धनची ३०० झाडे ४ वर्षापुर्वी ५' x ५' वर लावलेली आहेत. नारळ बाणवली १५० झाडे १२ वर्षापुर्वी १५ ' x १५' वर लावलेली आहेत. 'सिद्धीविनायक' शेवगा ५०० झाडे ८' x ८' वर ३ वर्षापुर्वी लावली होती. त्यातील २० झाडे ७ वर्षाची आहेत. कोकमची १०० झाडे १०' x १०' वर ३ वर्षापुर्वी लावलेली आहेत. लिंबू २०० झाडे ८' x ८' वर गेल्यावर्षी लावली आहेत. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी १० - १२ वर्षापासून वापरत आहे. झाड कसेही असले तरी फवारणीने झाड चांगले होते असे मुलाचे म्हणणे आहे. फवारणी मुलगा करतो.

नारळ १५० झाडांपैकी ६० - ७० झाडांपासून उत्पादन मिळते. त्यापासून वर्षाला २५ हजार रू. होतात. नारळाला फक्त कल्पतरू सेंद्रिय खत प्रत्येक झाडाला ८ ते १० किलोप्रमाणे वापरतो. सुपारीला १ ते १॥ किलो कल्पतरू खत वापरतो. इतर पालापाचोळा, नारळाच्या झावळ्याचे तुकडे करून खत करतो. सुपारीचे उत्पादन अजून सुरू व्हायचे आहे. ही दोन्ही झाडे उंच असल्याने फवारणी करत नाही. सरांनी सप्तामृताची फवारणी वेळोवेळी सांगितली. जेथे झाडे उंच असल्याने फवारणी जमत नाही तेथे फवारणीचे द्रावण ३ - ४ वेळा १० ते २० लिटर झाडाचा आकार, वयोमानानुसार व हेतू (फळ / फुले) याप्रमाणे आळवणी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या / प्रतिनिधींच्या सल्ल्याने करणे. काजू जुन्या ४०० झाडांपासून वर्षाला ६०० किलो सुके बी उत्पादन मिळते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून काजू मार्केटला विक्री केला जातो. जुन्या काजूला फक्त कल्पतरू (५०० ग्रॅम / झाड) खत वापरतो. कवारणी करत नाही. काजूच्या बाबतीत फवारणीचा अनुभव आम्हाला आस आला की, उत्पादन वाढते मात्र एवढ्या मोठ्या क्षेत्रावर दरवर्षी प्रत्येक वेळी फवारणी करणे शक्य होईलच असे नसते. म्हणून काजू, आंबा पिकाला काहीच फवारत नाही.

आंब्याची एकून ४५ झाडे आहेत. २ वर्षापुर्वी फयान वादळाने २ वर्षे उत्पादन मिळाले नाही. चालूवर्षी १६ -१७ झाडांना मोहोर लागला. १२५ पेटी (४ डझनची) माल मिळाला.

आंबा दरवर्षी येईलच असे नसते. तसेच तो खाली पडला तर डाग पडतो. फळमाशी त्रास देते. त्यामुळे आंबा कमी लावला आहे. काजूचे मात्र तसे नसते. काजूचे उत्पादन दरवर्षी मिळते. शिवाय काजू काढणीनंतर भाव कमी असले तरी तो साठविता येतो. काजूला डिसेंबरमध्ये मोहोर येतो आणि फेब्रुवारी - मार्चमध्ये चालू होतो. एप्रिल - मे मध्ये संपतो. हा काजू ४ - ५ महिने साठवून गणपती दिवाळीत वाढलेले भाव मिळतात.

'सिद्धीविनायक' शेवग्याचे डिसेंबर - जानेवारीत पीक चांगले मिळते. पावसाळ्यात मात्र अति पावसाने शेंगा गुळगुळीत होतात. ५०० झाडांपासून कमी - जास्त शेंगा लागून वर्षाला २५ हजार रू. होतात. विक्री दापोलीला २० - २५ रू./किलो भावाने होते. असे १२ एकर क्षेत्रातून हवामान लाभले तर साधारणत: १ ते १॥ लाख रू. होतात. काजू नवीन लागवड ८०० झाडे, सुपारी, लिबू, कोकमचे उत्पादन अजून चालू झाले नाही.

चालू हंगामात सुपारी, नारळ, कोकम, शेवगा, लिंबासठी कल्पतरू खत घेण्यास आज (१२ जून २०१३) आलो आहे. सप्तामृत गेल्यावर्षी ५ - ५ लि. नेले होते. त्यातील अजून शिल्लक आहेत. ती यावर्षी वापरणार आहे.