४ महिन्यात ३२ गुंठे 'सिद्धीविनायक' शेवग्याचे उत्पन्न ६ टन, १ लाख २२ हजार

श्री. तानाजी विठ्ठलराव जाधव,
मु.पो. तुरोरी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद,
मोबा. ९९७०५५५८७६गेल्यावर्षी मी 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याचे ९ पाकिटे बी आणि माझ्या चुलत भावाने ९ पाकिटे बी घेतले होते. मी २५ जुलै २०१३ रोजी थेट जमिनीत ६ x ६ फुट अंतरावर ठिबकवर ७०० बी लावले. जमीन पुर्णपणे खडकाळ, मुरमाड आहे. त्याला बेड केले होते आणि शेजारील दुसऱ्या रानात बेड न करता २०० बी टोकले. बी लावल्यानंतर १ महिन्यांची रोपे (झाडे) झाल्यावर सतत ८ दिवस पाऊस झाला. त्याने बेड केलेल्या रानातील रोपे निचर व्यवस्थित झाल्याने जगली, मात्र बेड न केलेल्या रानातील २०० पैकी फक्त २० रोपे जगली. आता ३२ गुंठ्यामध्ये ७२० झाडे आहेत.

चुलत भावाने लावलेल्या ९०० बियांपासूनच्या प्लॉटकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यांच्याकडे १०० एकराहून अधिक क्षेत्र व इतर व्यवसाय असल्याने शेवग्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.

आमचा प्लॉट ३ महिन्याचा असताना प्रथम शेंडा खुडणी केली. या शेवग्याला पावसाळ्यात पाणी द्यायची गरज भासली नाही. हिवाळ्यात १० दिवसाला पाणी देत होतो. उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्याने सामाईक विहीरीवरील पाण्याची पाळी ४ दिवस आमच्याकडे व ४ दिवस भावाकडे असते. ५ व्या दिवशी पाण्याची पाळी आल्यावर ७.५ एच. पी. ची. मोटर ३ एकर ऊस ३२ गुंठे शेवग्याला एकाच वेळी सलग ४ दिवस दररोज ३ -४ तास उन्हाळ्यात पाणी देत असे.

थंडीत शेवग्याला अधिक भाव उन्हाळ्यात माल अधिक आल्याने भाव कमी

२५ जुलै २०१३ ला लावलेल्या ह्या शेवग्याला दिवाळीत फुलकळी लागून डिसेंबरपासून शेंगा लागण्यास सुरुवात झाली. या अवस्थेत २ वेळा सप्तामृत फवारले. त्यामुळे फुलगळ थांबून शेंगा भरपूर लागल्या. १ फेब्रुवारी २०१४ ला पहिला तोड केला. त्यानंतर दररोज शेंगा तोडत होतो. दररोज ५० ते २०० किलोपर्यंत शेंगा निघत होत्या. शेंगा हिरव्यागार चवदार होत्या. फेब्रुवारीमध्ये ६० रू./किलो भावाने उमरगा, लातूर व गुलबर्गा मार्केटला शेवगा विकला. मार्चमध्ये ५० ते ५५ रू./किलो भाव मिळाला. एप्रिल महिन्यात ३० ते ३५ रू. किलो भाव मिळाला. मी मध्ये १५ ते २० रू./किलो भाव मिळाला. नंतर माल कमी झाला व २० मी च्या दरम्यान २-३ उन्हाळी मोठे पाऊस झाल्यावर होती तेवढीही फुले गळाल्याने आणि पुढील बहार बाजारभावाच्या हिशोबाने लवकर येण्यासाठी छाटणी करण्याचे ठरविले. कारण बाजारभावाच्या बाबतीत आमच्या से लक्षात आले की, थंडीच्या कालावधीत (उन्हाळ्यापुर्वी) जेवढा लवकर माल चालू होईल तेवढा भाव जादा असतो. जसजसा उन्हाळा वाढत जातो तसा मार्केटमध्ये माल वाढत जातो आणि भाव कमी - कमी होऊ लागतात. नंतर जूनपासून पुन्हा भाव वाढीस लागतात. त्यामुळे २५ ते ३० मे या कालावधीत शेवग्याची खरड छाटणी केली. आता (७ जून २०१४) मार्केटमध्ये ४० रू. किलो भाव चालू आहे.

शेवग्याच्या प्लॉटच्याकडेने ३ फूट रुंद, ३ फूट खोल असे २४० फूट लांबीचे जेसीबीने चर खोदून त्यामध्ये या छाटणी केलेल्या फांद्या गाडल्या. आता त्यावर कढीपत्ता लावणार आहे.

इतर शेतकऱ्यांच्या शेवग्यास भाव २० रू. आम्हाला ४० रू.

'सिद्धीविनायक' शेवग्याची शेंगा दिसण्यास हिरवीगार, आकर्षक व चविष्ट असल्याने मार्केटमध्ये आपल्या सर्व शेंगा दुप्पट भावाने ५ मिनिटात विकल्या जात. सोलापूरचे काही व्यापारी सोलापूर मार्केटमधील शेंगा आणून आमच्या येथे विकत असताना त्यांना २० रू. किलो भाव मिळाला तर आम्हाला ४० रू. किलो भाव मिळत होता. त्यांच्या शेंगाना कलर पांढरट पोपटी असल्याने कमी भाव मिळत असे.

गावरान कोंबडीपेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याची भाजी चविष्ट

आपली शेंगा जाड झाली तरी त्याचे बी व गर मऊ राहून ती कोवळ्या शेंगेपेक्षा अधिक चविष्ट लागते. माझे मांसाहार करणारे मित्र सांगतात, गावरान कोंबडीच्या मटणापेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याची भाजी चविष्ट लागते. प्रत्येक घासाला १ शेंग वरपून खाल्ली तर २०० रू. चा मटणाचा खर्च वाचतो. ८५ वर्षाचे माझे वडील वारकरी सांप्रदायातील असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना रोज ५ -१० शेंगा भेट देतात.

फेब्रुवारी ते मे या ४ महिन्याच्या काळात पहिल्याच बहारापासून ३२ गुंठ्यातील 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून १ लाख २२ हजार रू. झाले. एकूण ६ टन शेंगांचे उत्पादन मिळाले. आता नवीन १ एकर क्षेत्रात पुन्हा 'सिद्धीविनायक' शेवगा लावणार आहे.

'सिद्धीविनायक' शेवग्याने बी. पी. (रक्तदाब) च्या ३ गोळ्या घेणारा मी १ गोळी घेवू लागलो

मी बी. पी. चा पेशंट असून लातूरच्या बुक स्टॉंलवरून शेवगा व कढीपत्त्याचे औषधी गुणधर्म हे पुस्तक नेले. त्यातून शेवग्याचे आरोग्यविषयक ज्ञान झाल्याने शेंगा चालू झाल्यापासून ते माल संपेपर्यंत दररोज शेवग्याची १ वेळ भाजी खातो. पुर्वी मला बी. पी. च्या दिवसातून ३ गोळ्या चालू होत्या. ३ महिन्यात २ गोळ्या कमी झाल्या. आता १ गोळी चालू आहे. ती देखील बंद होईल अशी खात्री आहे.

गाईला शेवग्याच्या शेंगा खायला दिल्यावर ४ लि. दूध देणारी वासराचे भागून ६ लि. दूध देऊ लागली

शेवग्याच्या शेंगाचा दुसरा एक अनुभव असा आला की, आम्ही २० हजार रू. ला एक गाय आणली आहे. ती अगोदर ४ लि. दूध देत असे. ह्या गाईल आमच्याकडे आणल्यानंतर व्याल्यावर शेवग्याच्या जाड झालेल्या विक्रीस अयोग्य अशा १० ते १५ किलो शेंगा गाईला दररोज खाण्यास देतो. तर ती गाय वासराचे (कालवडीचे) भागून ६ लि. दूध देऊ लागली.

एकरी २०० टन ऊस

श्री. काकासाहेब पाटील, आष्टा नागाव ता. वाळवा, जि. सांगली (मो. ९५२७९११७७७) हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर उसाला बेणे प्रक्रियेस व ड्रेंचिंगसाठी वापरतात. तर ते एकरी २०० टन ऊस उत्पदान काढतात. त्यांचे प्लॉट पाहण्यास दररोज ५० -१०० लोक येतात. त्या सर्वांना ते जर्मिनेटर व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा सल्ला देतात. मी त्यांचा प्लॉट पहिला तेव्हा त्यांनी मला ही माहिती दिली. मी २ -३ वेळा त्यांच्याकडे जाऊन आलोय. तेच बिदाल ता. दहिवडी, जि. सातारा येथील श्री. अशोक इंगवले, मोबा. ९०२१७८२५६३ हे डाळींबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात. तर ते ५ एकरातून २ कोटी रू. चे उत्पन्न काढतात. यांचेही प्लॉटमी पहिले आहेत.

शेवग्यासाठी लागणारी सप्तामृत औषधे व कल्पतरू सेंद्रिय खत मी बँकेत पैसे भरून पार्सलने मागवू शकलो असतो, मात्र 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या अनुभवातून आणि वरील प्रगतीशिल शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेवरून सरांची १ मिनिट का होईना पण भेट घ्यायचीच यासाठी खास आज आलो आहे.