१५ एकर तैवान पपईचे भरघोस उत्पादन व नफा

श्री. मोहन बन्सीलाल सोनवणे,
मु. पो. बामखेड (त. त.) ता. शहादा, जि. नंदुरबार - ४२५४०९.
मोबा - ९४२१५३३६७९


२० वर्षापासून ३० एकर क्षेत्रावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा यशस्वी वापर

मी कुडावद (ता. शहादा) येथील प्राथमिक शाळेवर शिक्षक पदावर नोकरी करत असून कुडावद येथील प्रगतीशील बागायतदार श्री. भटू सखाराम चौधरी (B.Sc.Agri) हे २० वर्षापासून त्यांच्या ३० एकर जमिनीमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहेत. माझी बामखेड गावी शेती आहे. नोकरी करून शेती करताना नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधता असतो. सेंद्रियशेती तंत्रज्ञानासंदर्भात सविस्तर माहिती जमवत असताना श्री. भटू चौधरी यांची भेट झाली. त्यांनी मला सांगितले, "मी आतापर्यंत मार्केटमधील सर्व कंपन्यांची औषधे वापरली आहेत. मला डॉ.बावसकर तंत्रज्ञानासारखे रिझल्ट कधीच मिळाले नाहित. तेव्हा तुम्हीदेखल विनाकारण इतर औषधांच्या चाचपणीत वेळ घालवू नफा. फक्त एकदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत किमान १ - १ लि. वापरून पहा व काय रिझल्ट मिळतात ते सांगा, मला खात्री आहे की हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुम्ही त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच मागणार.

इतरांच्या प्लॉटवर व्हायरस असताना आमचा १५ एकर प्लॉट व्हायरसमुक्त

त्यानंतर भटू चौधरींचे पपई , केळीचे प्लॉट मी पहिले. त्यांनी गेल्यावर्षी १५ एकर तैवान पपई लावली होती. ह्या प्लॉटला पहिल्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे स्प्रे ते घेत होते. तर प्लॉट पाहिल्यावर असे लक्षात आले की, इतरत्र पपईचे प्लॉटवर व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवत असताना त्यांच्या १५ एकर पपईवर व्हायरस कोठेही जाणवला नाही. सर्व प्लॉटमधील झाडांची पाने हिरवीगार, टवटवीत होती, कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव या बागेवर नव्हता. या बागेतील सर्व माल जागेवर १० रू./किलो भावाने विकला गेला.

सध्या त्यांची १० एकर वेळीची बाग असून तिला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या चालू आहेत.

भटू चौधरी चे प्लॉट पाहून मी प्रभावित होवून प्रथम ३ महिन्यापुर्वी 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. कृषी विज्ञान मासिकातील माहिती, शेतकऱ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मत करून घेतलेले कमी पाण्यावर निर्यातक्षम, भरघोस उत्पादनाच्या मुलाखती वाचून डॉ.बावसकर तंत्रज्ञान एकदा वापरून पहायचेच असे ठरविले व आज २ जून २०१४ रोजी पुणे ऑफिसला समक्ष येऊन सविस्तर सरांशी चर्चा केली व डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचे विविध विशेषांक (शेवगा, केळी, पपई, आले, कापूस, डाळींब, संत्री -मोसंबी - लिंबू ) आणि १ - १ लि. सप्तामृत औषधे घेऊन जात आहे. आता हे सरांच्या मार्गदर्शनानुसार १० एकर कापसाला वापरणार आहे.

१० एकर कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

आम्ही अजित -१५५ चा ५ एकर आणि राशी -२ वाणाचा ५ एकर कापूस लावला आहे.

सरांनी यावेळी सांगितले की, "३० वर्षापुर्वी दक्षिण भारतातील संशोधकांनी राशी -२ जातीचे नर -मादीचे बिजोत्पादन पाचोरा तालुक्यात करताना डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून राशीचे बिजीत्पादनाचा पहिला यशस्वी प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतले. त्यानंतर म्हणजे वरलक्ष्मीनंतर राशी २ ह्या वाणाने १५ ते २० वर्षे राज्य केले. आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून मला १ महिन्यात कपाशीवर जर रिझल्ट मिळाला तर माझ्या संपर्कातील १५ ते २० शेतकरीदेखील हेच तंत्रज्ञान वापरातील. गुजर व माळी समाजाचे माझे सहकारी हे २ -२ कोटीचे पपई उत्पादन घेतात. ते देखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून उत्पादन व दर्जात वाढच करतील.