वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर म्हणजे हमखास यश !

श्री. गुलाब दत्तात्रय निंबाळकर,
मु.पो. देऊळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.
मोबा ९४२२२२३९९३


आम्ही सिमला मिरचीची लागवड केली असून त्याचे अंतर ६' x १।।' असे ठेवले आहे. शेतीच्या मशागतीसाठी छोटा ट्रॅक्टर उपयोगात आणला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने २ फुटाचा गादी वाफा तयार करून घेतला. शिमला मिरचीची लागण करताना प्रथमत: हायटेक वाल्यांना भेटून त्यांच्या कडून रोपे विकत आणली. ती रोपे २ रू. १० पैसे/नगाने मिळाली असून २।। हजार रोपांची अर्धा एकरात लागवड केली आहे. त्या मिरचीला पाण्यासाठी इनलाईन ड्रिप केली आहे आणि मिरचीला पाणी हे नियमितपणे ड्रिपच्या सहाय्याने रोज २ तास दिले जाते. आमच्याकडे २० एकर शेतजमीन आहे. त्यातील १० एकर जमिनीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करत असून याचा उत्तम अनुभव आला. आम्ही शिमला मिरचीला सप्तामृताचा वापर करतो. त्यानंतर केळी, ऊस , कांदा ही पिकेही घेतो. पाणी मुबलक असल्याने पाणी चार लिटरचा डिस्चार्ज दोन तास चालतो. शेतात शेणखताचा वापर चांगल्या प्रमाणात केला आहे. २ ट्रॉली खत अर्धा एकरातील मिरचीच्या बेडवर टाकले आहे आणि मिरचीच्या जोमदार वाढीसाठी व भरघोस उत्पादनासाठी डॉ.बावसकर सरांच्या कल्पतरू या सेंद्रिय खताचा सुद्धा वापर केला आहे. शेणखत चांगले कुजलेले पूर्ण बेडवर टाकले. त्यासोबत ४ बॅगा (२०० कि. ग्रॅ.) निंबोळी पावडर, सिंगल सुपर फॉस्फेट आणि कल्पतरू सेंद्रिय खत टाकले आणि नंतर दाताळ्याने ओढून सर्व सरी बुजवून टाकल्यानंतर दांड पुर्णपणे भिजवून घेवून त्या गादी वाफ्यावर होल पाडून घेतले. लागवडीनंतर ८ दिवसांनी या मिरचीला सप्ता मृताची फवारणी घेतली. तेव्हा ही रोपे वितभर होती. फवारणी घेतल्यावर रोपे टवटवीत झाली म्हणून पुन्हा सप्तामृताचा ७ दिवसांनी दुसरा फवारा घेतला. त्यात थोडे किटकनाशक वापरले. दोन फवारण्यात मिरची २ ते २।। फूट उंचीची झाली होती. प्रत्येक झाडावर ३५ ते ४० फुले दिसायला लागली होती आणि दोनच महिन्यात म्हणजे किमान ५५ ते ६० दिवसात ढोबळी मिरची काढायला सुरुवात केली.

आठवड्यातून दोन तोडे मिरचीचे झाले. दोन्ही मिळून ५ पोती ढोबळी मिरची निघाली. एका पोत्यात कमीत - कमी २० किलोपर्यंत मिरची बसते. मालाला मंगलमुर्ती ट्रेडींग कंपनीत १२ रू./ किलो प्रमाणे भाव मिळाला. आज रोजी म्हणजे १२ मे २०१४ पर्यंत ५ ते ६ तोडे झाले आहेत. तिसऱ्या तोड्यापासून २० रू. भाव मिळाला. त्यात मध्येच खराब हवामानामुळे माल पिवळ पडला असून त्याचा वरून रंग खराब झाल्याचे जरी दिसून आले तरी आतून मात्र माल चांगला होता. मार्केटला माल आणला असता असे लक्षात आले की, मार्केटला जास्त मोठ्या मिरचीला भाव नाही. रंगीत मिरचीला मात्र मार्केटमध्ये उत्तम भाव आहे. आणि मागणी पण खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे समजले. जर मिरची साईज ही मेडिअम असेल तर बऱ्यापैकी मार्केट मिळते.

सध्या फवारणी लेट झाल्यामुळे बोकड्या आला आहे. माल व्यवस्थित लागला नाही. फुलगळ झाली. बोकड्या, बुरशी आली म्हणून सरांनी फवारणी करायचा सल्ला दिला. त्यात सरांनी सांगितले प्रोटेक्टंट पावडर अर्धा किलो घेवून १० लिटर पाण्यातून निवळी करावी आणि थ्राईवर ६०० मिली, क्रॉपशाईनर ६०० मिली, राईपनर ३५० मिली, न्युट्राटोन ३०० ते ४०० मिली, हार्मोनी ३०० मिली स्प्लेंडर ३०० मिली १५० लि. पाण्यामध्ये घेवून फवारणी करावी. जर आपण बॅटरी पंप वापरत असाल तर प्रोटेक्टंट पावडरची निवळी करण्याची गरज नाही. या पद्धती ने फवारणी केल्याने पिकावरील रोग जावून फलधारणा उत्तम होते. प्रोटेक्टंट हे आयुर्वेदिक किटकनाशक व बुरशीनाशक म्हणूनही काम करते. तद्नंतर फवारणी केल्यावर क्रॉपशाईनरमुळे आकर्षक चकाकी आली, न्युट्राटोनमुळे पोषण होऊन चव व रंग आला आणि राईपनरमुळे फळांची साईज, वजन वाढून नैसर्गिक रंग आल्याचे जाणवले.

पावसाळ्याच्या सुरूवातीला टोमॅटो, मिरची यांच्या खोडाजवळ काळे ठिपके पडतात. यावर उपाय म्हणून आपण जर सुरूवातीपासूनच सप्तामृताचा वापर केला तर या प्रकारची रोगराई पावसाळ्यातसुद्धा येत नाही आणि शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होतो. बऱ्याच शेतकऱ्यांशी चर्चा करताना सरांच्या असे लक्षात आले की, पिकांना पाणी शेतकऱ्यांकडून लोड शेडिंग (भारनियमना) मुळे बेटाईम (अवेळी) आणि प्रमाणापेक्षा जास्त दिले जाते. यामुळे पीक खराब होते, असे सरांनी सांगितले, ड्रिपमधून बरेच शेतकरी पाणी देतात आणि ड्रिप बंद करायला उशीर होतो, त्यामुळे पिकांना जास्त पाणी होते. परिणामी मुळ्या मुक्या होतात आणि जास्त पाण्याने जमिनीचा पोत बिघडतो. असे डॉ. बावसकर सरांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून जर्मिनेटर आणि प्रिझम प्रत्येकी १ लिटर २०० लि. पाण्यातून ठिबकद्वारे मुळाजवळ सोडावे. यातून मुकी झालेल्या मुळीची चाल सुरू होते आणि पिकाची व्यवस्थित वाढ होते. ४ लि. प्रति तासाला पाणी देत असतांना पाणी फक्त तिनच तास देणे आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कल्पतरू सेंद्रिय खत वापरणे. उत्तम पिकांसाठी आपल्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची नियमित फवारणी करणे. यामुळे पिकाचा रंग, आकार, चव, चकाकी, टिकाऊपणा हे उत्तम प्रतीचे व अधिक भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांच्या अनुभवातून जाणवले.