खडकाळ माळरानावर फपुट्यात ३ वर्षात आंब्याचा रस चाखला !

श्री. सुरेश दत्तात्रय पाडळे,
मु.पो. म्हाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे.
मोबा. ९८२२१९९७८९


झाडे जगवणे हे फार मोठे काम आहे. झाडांविषयी बोलायचे झाले तर सरांना देशात तोड नाही. कारण आम्ही फपुट्याच्या खडकाळ जागेतील १० वर्षापुर्वी जेसीबीने खडक निघेना म्हणून ब्रोकर लावून खड्डे २०' x २०' वर घेतले व त्यात माती भरून केशर व हापूस आंब्याची रोपे लावली. कलमे खेड येथून सरकारी नर्सरीतून आणली होती.

सरांनी जेव्हा लागवड करताना झाडे पाहिली व सरांचे लेक्चर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी झाले. तेव्हा सरांनी सांगितले की, या आंब्याच्या रस ३ वर्षांनी खाल. अगदी तसेच ३ वर्षात आंबे लागलेत. हा मोठा अनुभव सरांचा आम्हाला आला.

१ फुटाची झाडे पाहिली तेव्हा सरांनी सांगितले, "आजूबाजूला माळरान आहे. उन्हाने फपुटा तापत आहे. त्याचा रोपांना शॉक बसू नये म्हणून झाडाच्या चारीबाजूला बांबू रोवून त्यावर नारळाच्या झावळ्याने वरून सावली करा. सावलीसाठी प्लॅस्टिक वापरू नका. कारण प्लॅस्टिक उन्हाने तापून रोपांभोवती अधिक उष्णता निर्माण होईल व ते रोपास बाधक ठरेल. म्हणून नारळाच्या झावळ्यांची झाडांना सावली करा. कारण त्या झावळ्यांमधून झाडांना हवा गाळून जाते, त्यामुळे झाडाभोवती गारवा निर्माण होऊन झाडे प्रतिकुल वातावरणातही वाढतात." या झाडांना कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस देऊन जर्मिनेटरची ड्रेंचिंग केली. तर झाडांचा जारवा वाढून फुट निघाली होती. पुढे 'कृषी विज्ञान' मासिकात दिल्याप्रमाणे सप्तामृत औषधांच्या नियमित फवारण्या केल्याने झाडे १ वर्षात ३।| ते ४ फुटाची झाली. मरणाचे (भयंकर) ऊन होते तरी पाने टवटवीत, हिरवीगार होती.

त्यानंतर पावसाळ्याच्या सुरूवातीस पुन्हा कल्पतरू प्रत्येक झाडांचा ५०० ग्रॅम देऊन पाणी दिल्यावर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले आणि सप्तामृताच्या फवारण्या घेत गेलो. असे २ वर्षे केल्यानंतर ३ वर्षांनी मोहोर लागला. त्या अवस्थेत झाडे ५ - ६ फुट उंचीची होती. झाडांवर सप्तामृताच्या नियमित फावाण्या घेत असे.

एकूण १५३ झाडे आहेत. या झाडांपासून असे ५ - ६ वर्षे उत्पादन घेतले. तेव्हा आंबा अजिबात विकला नाही. हा आंबा घरी खाण्यासाठी तसेच पाहुण्यांना आणि गोरगरीबांना वाटला. यावर्षी ७ व्या बहाराची फळे काढणीस आली आहेत. सर्व झाडे फळांनी लगडलेलि आहेत.

कालच (३० मे २०१५) एका झाडावरील फळे उतरवली तर ६०० हले निघाली. याप्रमाणात फळे असल्याने आता एवढी फळे आपल्याकडून वाटली जाणार नाहीत. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच आंबे विक्री करणार आहे. त्याकरिता आज थोडी (सँपल) फळे पुणे मार्केटला आणून २ - ३ ठिकाणी दाखविली, तर आज ३० रू./किलोप्रमाणे कच्चा केशर आंबा व कच्चा हापूस आंबा ३२ रू./ किलोप्रमाणे विकला जाईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले. फळे वजनदार ४०० ते ४५० ग्रॅमची आहेत. तेव्हा हा दर सरांनी सांगितले, "खूपच कमी आहे. जर केशर आंबा देठाजवळ पिवळा झाला आणि हापूस लालसर झाला की काढला आणि तो गवताच्या काडात पिकविला तर हाच केशर १०० रू. आणि हापूस २०० रू./किलो दराने जाईल."

आंबा लहान असताना ५ - ६ वर्षापुर्वी आम्ही आल्याचे १ एकरमध्ये आंतरपीक घेतले होते. बेणे साताऱ्यातील नागठाण्याहून आणले होते. याला स्प्रिंक्लर केले होते. लागवडीच्यावेळी कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा दिल्या होत्या. जमीन मुरमाड निचर्याची आहे. सरांच्या मार्गदर्शनानुसार वेळच्यावेळी जर्मिनेटर व हार्मोनीचे ड्रेंचिंग आणि सप्तामृताच्या फवारण्या केल्याने आले लागले नाही. आल्याचे उत्पादनही त्यावेळी चांगले मिळाले.

८० ते १०० रू./किलो आल्याला पुणे मार्केटमध्ये बाजारभाव मिळाले. आता आंबा फळबागेसोबर ऊस, झेंडू, बटाटा ही पिके घेतो. जमीन पूर्ण खडकाळ असूनही त्या रानात ऊस केला. या उसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू खत देऊन सप्तामृताच्या २ - ३ फवारण्या केल्या. जर्मिनेटरचे २ वेळा ड्रेंचिंग केले होते. तर ऊस असा बसला होता की लोक आश्चर्यचकित होत. एवढ्या मुरमाड जमिनीत एवढा कसा ऊस पोसला ? असे ऊस तोडणीवाले म्हणत. एकदम हलक्या प्रतिची जमीन असूनदेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकरी ८० टन उत्पादन मिळते.

आमचे भावकीतील मधुकर संभाजी पाडळे (मोबा. ९८५०८०९०२९) हे देखली माझ्याप्रमाणेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी आंबा व ऊसाला वापरतात. त्यांचीही आंब्याची बाग फळांनी लगडलेली आहे. फळांचा दर्जाही उत्तम असून त्याचेही सॅम्पल आज आणले होते.