थायमेटमुळे ९०% अधिक सर्व भात रोपे मेलेली जर्मिनेटरमुळे जगून इंद्रायणी भात उत्तम आले

श्री. विजय गायकवाड,
मु.पो. कांब्रे, ता. मावळ, .
मो. ९८२३६७१९८७


२००० साली आमही इंद्रायणी भाताची रोपे तयार केली होती. तेव्हा ३० - ३५% उगवण झाल्यानंतर खेकड्यांच्या नियंत्रणासाठी थायमेट वापरताना माझ्याकडून प्रमाणामध्ये चुकून वाढ झाली. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम रोपांवर झाला. रोपे करपू लागली. फक्त रोपांचा कोंब दिसत होता. त्या अवस्थेत कृषी पर्यवेक्षक श्री. रत्नाकर जाधव साहेब (मो. ९८२३६७१९८७) यांना यावर उपाय विचारला असता त्यांनी आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर १५ लि. पाण्याला १०० मिली प्रमाणे घेऊन दाट फावण्यास सांगितले. त्यांनी मला पुण्याहून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ऑफिसमधून जर्मिनेटर आणून दिले. ते १५ लि. पंपाला पुर्ण टाकून फवारले असता ३ ऱ्या दिवसापासून कोंब वाढीस लागले. रोपे तरारली विशेष म्हणजे पारंपारिक पद्धतीपेक्षा रोपे चांगली आली आणि याची पुनर्लागवड केली असता लागवड ही यशस्वी झाली. आणि उत्पादनातही वाढ झाली. विशेष म्हणजे रोपे गेल्यामुळे जी लागवडच होणार नव्हती अशी परिस्थिती उद्भवली होती आणि त्यामुळे पूर्ण वर्ष खाली जाण्याची भिती निर्माण झाली होती, त्यातून आम्ही बचावलो व रोपे यशस्वी होऊन आमचा हंगाम वाया न जाता चांगल्याप्रकारे उत्पादनही मिळाले.