उन्हाळी भुईमूग व संत्र्यास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी अत्यंत, फायदेशीर उत्पादन व भावही अधिक

श्री. सुरेशराव उत्तमराव फरकाडे,
मु.पो. मांडवा, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती - ४४४६०२.
मो. ८४१२०४६४६२



माझ्याकडे वडिलोपार्जित १० एकर जमीन आहे. 'कृषी विज्ञान' मासिकामधील शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून मी २०१६ मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे ठरवले. तेव्हा मी आमच्या भागातील विक्रेते विश्वकर्मा ट्रेडर्स यांची थेट भेट घेतली आणि तेव्हापासून मी सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा या पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे घेतली. त्यावेळेस त्यांनी आमच्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधींचा मोबाईल नंबर दिला. त्यानुसार त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला माझ्या शेतावर भेट देऊन भुईमूग पिकाबद्दल माहिती दिली. मला पेरायचा आधी कल्पतरू खत टाकण्यास सांगितले. मग मी एकरी २ बॅगा कल्पतरू खत टाकले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला जर्मिनेटर + प्रोटेक्टंट- पी ची बीजप्रक्रिया केली. एकरी ४० किलो बियाणे याप्रमाणे ट्रॅक्टरने पेरणी केली. त्याच दिवशी स्प्रिंकलरद्वारे १ शीप (४ तास पाणी) दिले व तेथून १० ते १२ दिवसांनी भुईमूग उगवत असल्याचे दिसू लागले.

तेथून २२ दिवसांनी १०:२६:२६ एकरी १ बॅग याप्रमाणे खत टाकले. त्यांनतर दुसरा डोस फुलावर असताना कल्पतरू ५० किलो + पोटॅश ५० किलोचा दिला. खत दिल्यावर जर्मिनेटर २५० मिली + प्रिझम २५० मिली + पॉलीफ्युवर + हार्मोनी १०० मिली यांचा १०० लि. पाण्यातून स्प्रे दिला. या स्प्रेमुळे पानातील पिवळेपणाचे प्रमाण कमी झाले व भुईमूग टवटवीत दिसू लागला व तेथून १५ दिवसांनी पुन्हा ०:५२:३४ + रेडोमिल + थ्राईवर याचा स्प्रे घेतला. त्यामुळे फुले जोमाने येऊ लागली.

त्यावर २ घंटे प्रमाणे स्प्रिंकलरने पाण्याच्या पाळ्या चालू होत्या. पाणी देणे झाल्यावर २० दिवसांनी फाटे सुटण्यास सुरुवात झाल्यावर पाणी देणे बंद केले व त्याला १२ दिवसांनी तळण दिली व त्यानंतर पुन्हा पाणी चालू केले. पाणी देणे झाल्यावर अंडे पकडण्याच्या (आऱ्याला लहान शेंगा लागण्याच्या) अवस्थेत १३:०:४५ + राईपनर + थ्राईवर + न्युट्राटोनचा प्रतिनिधींच्या सांगण्याप्रमाणे स्प्रे केला. त्यामुळे शेंगा भरण्यास सुरुवात झाली व मे च्या २१ तारखेला भुईमूग उपटण्यास (काढण्यास) सुरुवात केली. तेथून ८ दिवस आम्हाला भुईमूग उपटण्यास लागले. त्यानंतर शेंगांना दोन दिवसांचे ऊन देऊन मार्केटला न्यायची इच्छा होती, पण भाव अतिशय कमी असल्याने आम्ही माल पोती भरून ठेवला. जवळपास ४ एकरात आम्हाला ३२ क्विंटल भुईमुग (शेंगा) झाला. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पीक पण चांगले आले. त्यामुळे हल्ली २३०० रु. प्रती क्विंटल या भावाने सुद्धा आम्हाला घाटा (तोटा) झाला नाही. बाकीच्या लोकांना या भावात त्यांचा खर्च सुद्धा निघाला नाही. कारण त्यांचे उत्पादन आपल्या तुलनेत फार कमी होते. कोणाला एकरी ४ - ५ क्विंटल तर क्वचित लोकांना ६ क्विंटल उत्पादन मिळाले.

माझ्याजवळ २५० संत्रा झाडे आहेत. त्यावर सुद्धा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे स्प्रे चालू आहेत. मागील वर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फक्त ४ स्प्रेमध्ये संत्रा काढला. फळ पण चांगले होते व जास्त दिवस बगीचा टिकला. भाव पण त्यामुळे चांगला मिळाला. याकरिता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आभार मानतो.