सुपर सोनाकाचे वर्षाला ४ लाख तर ब्लॅक जंबो (नानासाहेब पर्पल) चा एकरी ७ लाख निव्वळ नफा

श्री. भारत विठ्ठल बनकर,
मु.पो. बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर,
मो. ९६५७३३७५००


आम्ही गेली १० वर्षापासून द्राक्ष, डाळींब पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरतो. त्यावेळी तास - ए- गणेश, साधी सोनाकाच्या द्राक्षबागा होत्या.

सध्या २०१४ मध्ये लावलेल्या सुपर सोनाका २।। एकर आणि ब्लॅक जंबो (नानासाहेब पर्पल) १ एकर या दोन्ही द्राक्ष बागांना एप्रिल छाटणी केल्यावर ४ -५ डोळ्यावर सबकेन केल्यानंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर याचे ३ - ४ दिवसाड आलटून पालटून असे प्रत्येकाची १ - १ फवारणी घेतो. त्यामुळे घड निर्मितीचे कार्य जोरात होते. घड गळीचे प्रमाण अत्यल्प असते. जवळजवळ ९९% गळ होत नाही.

त्यानंतर ऑक्टोबर छाटणीपर्यंत फक्त बोर्डो मिश्रण, सल्फर (गंधक) आणि किटकनाशक यांचीच फवारणी आवश्यकतेनुसार घेतो. त्यानंतर ऑक्टोबर छाटणी केल्यावर ५ व्या दिवशी जर्मिनेटरची फवारणी घेतो. त्यामुळे डोळ्यांची सुप्त अवस्था मोडून नवीन फुट जोमाने निघून ती एकसारखी वाढते. घडाची अवस्था प्रिब्ल्युम (टोपण निघण्या अगोदरची अवस्था) असताना थ्राईवर, क्रॉपशाईनरची फवारणी घेतो. त्यामुळे घडाची एकसारखी वाढ होते. पाकळ्या व त्यातील अंतर वाढून घडाचा आकार वाढतो. मण्यांची वाढ एकसारखी होते. त्यानंतर फ्लॉवरींग अवस्थेत असताना क्रॉपशाईनर फवारतो. त्यामुळे पाने हिरवीगार राहून कॅनॉपी भरपूर वाढल्याचे दिसून येते.

नंतर छाटणीनंतर ३० - ३२ दिवसांनी थिनिंग केल्यानंतर थ्राईवर, क्रॉपशाईनरचा एक स्पे घेतो. त्यामुळे घडाची वाढ एकसारखी होते. आकार एकसारखा दिसतो. शॉर्ट बेरीज अजिबात होत नाही. आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे आदर्श कृषी सेवा केंद्र, मोडनिंब येथून घेतो. ते आमच्या येथून ५ किमीवर असल्याने मोडनिंब बाजारपेठ आम्हाला जवळ पडते.

मणी फुगवणीसाठी जी. ए. वारपतो. तसेच वातावरणातील बदलानुसार डावणी, भुरीसाठी द्राक्ष बागायतदार संघाच्या शिफारशीप्रमाणे बुरशीनाशके, किटकनाशके, संजीवके यांचा वापर करतो. हार्मोनी वापरले नव्हते, पण आता मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार हार्मोनी डावणी व भुरीसाठी वारपणार आहे. मला खात्री आहे की डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या बाकीच्या औषधांप्रमाणे हार्मोनीचाही चांगला रिझल्ट मिळेल. एरवी इतर औषधांच्या दिवसाड फवारण्या घ्याव्या. लागतात. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या वेगवेगळ्या अवस्थेत वरील ४ - ५ फवारण्या घेतल्यामुळे इतर फवारण्या ५ - ६ दिवसाच्या अंतराने केल्या तरी बाग निरोगी राहते. त्यामुळे औषधांच्या खर्चात व फवारणीच्या (मजुरी) खर्चात बचत होते.

ब्लॅक जंबोला १०० ते ११० रु. भाव

एरवी ऑक्टोबर ते माल काढणीपर्यंत ४० - ४५ हजार रु. औषधे व ती फवारण्यांचा खर्च होते. तोच डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ४ - ५ फवारण्या केल्या की २० - २५ हजारात माल निघतो. म्हणजे एकूण फवारणीवरील एकरी १५ - २० हजार रु. खर्च वाचतो. शिवाय सुपर सोनाकाचे एकरी १६ ते २० टन उत्पादन मिळते. ब्लॅक जंबो (नानासाहेब पर्पल) या जातीचे एकरी १० टनच उत्पादन काढतो, पण तो माल जागेवरून १०० रु. ते ११० रु./ किलोने निर्यातदारांना देतो. त्यामुळे या जंबोपासून एकरातून १० -११ लाख रु. मिळतात.

रासायनिक (N.P.K.) खते, सेंद्रिय कंपोस्ट खते, गांडूळ खत, निंबोळी पेंड, औषधे फवारण्या, मजुरी असा २ ते २।। लाख रु. खर्च वर्षभराचा (एका पिकाचा) होतो. निव्वळ उत्पन्न ७ लाख रु. एकरातून शिल्लक राहतात.

सोनाकाचे एकरी १६ ते २० टन उत्पादन

सुपर सोनाका जागेवरून ३० ते ३५ रु. किलोने देतो. किरकोळ विक्रेते स्थानिक बाजारात विक्रीसाठी नेतात. एकरी १६ ते २० टन उत्पादन मिळून त्याचे ६ - ६।। लाख रु. होतात. याला १।। - २ लाख रु. पर्यंत एकरी खर्च येतो. खर्च वजा जात ४ लाख रु. राहतात.

भागव्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी अत्यंत किफायतशीर

भगवा डाळींबाला छाटणी करून पानगळ केल्यावर जर्मिनेटर मुळाला (ड्रिपमधून) सोडतो. त्यामुळे पांढरी मुळी अधिक निघून नवीन बंच (तांबडी फुट) चांगल्याप्रकारे एकसारखी दिसून येते. त्यामुळे कळ्या वाढून फळांची संख्या भरपूर मिळते. कळी गळू नये म्हणून थ्राईवर, क्रॉपशाईनर फवारतो.

कळी सेट झाल्यावर फळाची वाढ होण्यासाठी १० - १५ दिवसाच्या अंतराने थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनरच्या फवारण्या घेतो. त्यामुळे फळांचा आकार एकसारखा मिळतो. डाळींबाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ४ - ५ फवारण्या व इतर किटकनाशक, बुरशीनाशकाच्या वातावरण बघून फवारण्या घेतो.

झाडावर ७० ते ८० फळे धरतो. बाकी विरळणी करून काढतो. १५० ते ५०० ग्रॅमची साईज मिळते. एकूण १५०० झाडे ४ एकरामध्ये आहेत. साधारण सर्व मिळून ३५ टन उत्पादन मिळते.

भगवा डाळींबाचा आड हंगामी ऑगस्टमधील बहार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने यशस्वी

आमच्या भागात पाऊस उशीरा (जुलै - ऑगस्टमध्ये) सुरू होत असल्याने आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी नंतर पाणी कमी पडते. त्यामुळे आम्ही डाळींबाचा आड हंगामी बहार (ऑगस्टचा) धरतो. हा बहार पावसाळी वातावरणामुळे ताण व्यवस्थीत बसत नसल्याने कोणाला साधत नाही. मात्र आम्ही अनुभवातून हा बहार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या मदतीने यशस्वी करतो. हा आडहंगामी बहार असल्याने - जानेवारी फेब्रुवारीमध्ये (द्राक्ष, आंबा मार्केटला येण्यापुर्वी) येतो. त्यामुळे चांगले बाजारभाव मिळून डाळींबाचे पैसे होतात. जुनमध्ये कधी - कधी पानगळ न होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे आम्ही कोंबड खत १ किलो/झाड देतो. १० हजार रु. टनाने कोंबड खत मिळते. हे खत दिले की लगेच २ - ३ दिवस थोडा - थोडा वेळ ठिबक चालू करतो. त्यामुळे आम्ही कोंबड खत १ किलो/झाड देतो. १० हजार रु. टनाने कोंबड खत मिळते. हे खत दिले कि लगेच २ - ३ दिवस थोडा - थोडा वेळ ठिबक चालू करतो. त्यामुळे मुळी कार्यरत होते आणि मुळीने खत शोषणे सुरू केले की परत पाणी देणे बंद करतो. त्यामुळे उष्णता निर्माण होऊन झाडाची पाने आपोआपच पिवळी पडण्यास सुरुवात होऊन पानगळ चांगल्याप्रकारे होते. पानगळ झाल्यानंतर बहार धरताना मात्र नियमीत पाणी देतो. त्यामुळे कोंबड खताचा झाडांना धोका निर्माण होत नाही.

दरवर्षी साधारण जुनपासून पाणी तोडतो. २५ जुलैपर्यंत पानगळ होते. त्यानंतर खते देऊन पहिले पाणी १ ऑगस्टला देतो. हा माल जानेवारी - फेब्रुवारीत आडहंगामी विक्रीस येतो. आड हंगामामुळे सरासरी भाव ५० - ६० रु./किलो मिळतो. विक्री पुणे, पंढरपूर, हैद्राबाद, मुंबई मार्केटला मालाच्या प्रतिनुसार करतो.

२५० ते ५०० ग्रॅमचा माल मुंबई मार्केटला दलालामार्फत (महालक्ष्मी फुट मार्केट, वाशी) निर्यातदाराला देतो. येथे आम्हाला ७० - ८० रु. भाव मिळतो. २५० ग्रॅमच्या आतील माल पंढरपूर, पुणे, हैद्राबाद मार्केटला देतो. तेथे ४० - ५० रु./किलो भाव मिळतो. ४ एकरमधून ३५ टन मालाचे १५ - २० लाख रु. पर्यंत उत्पन्न मिळते. या ४ एकराला २ लाख रु. पर्यंत खर्च येतो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर २० हजार रु. ४ एकराला खर्च करतो. द्राक्षाला एकरी १० ते १५ हजार रु. खर्च येतो.