३६ गुंठे कलिंगड, ७० दिवसात २३ टन २०० किलो उत्पादन, १ लाख ८ हजार उत्पन्न

श्री. गोविंद शेखा राठोड,
मु.पो. लवुळ नं. १, ता. माजलगाव, जि. बीड - ४३११३१.
मो. ९९७०७२८६२७मला एकूण फक्त ८४ गुंठे क्षेत्र आहे. परंतु ते बागायती असल्यामुळे एका वर्षमध्ये २, ३ पिके घेवून त्या जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

या वर्षी (२०१६) पर्जन्यमान बऱ्यापैकी झाल्यामुळे जुनमध्ये कापूस लागवड केली. परंतु अतिरिक्त पावसामुळे पातेगळ होवून पाहिजे तसे समाधानकारक उत्पादन मिळाले नाही. म्हणून मी टरबूज लागवड करण्याचे ठरविले व दि. २२/०१/२०१७ रोजी सागरकींग (सागर सिडस) या वाणाची निवड केली. लागवड केल्यापासून तिसऱ्या दिवशी उगवण क्षमता १००% झाली. १० व्य दिवशी जर्मिनेटर १ लि. ड्रीप मधून सोडले व दर पंधरा दिवसाच्या अंतराने (जर्मिनेटर, थ्राईवर, राईपनर, प्रिझम, प्रोटेक्टंट-पी, हार्मोनी, स्प्लेंडर इ.) औषधांचा तसेच इतरही किड नियंत्रणासाठी फिप्रोनिल, इमामेक्टीन बेन्झीएट, कार्बन्डेझिम, मॅन्कोझेब इ. औषधांचा वापर केला. लागवडीचे अंतर ५' x १.५' ठेवले व वेळेअभावी मल्चिंग व बेडचा वापर करता आला नाही तरीही अत्यंत व्यवस्थीतपणे संगोपण करून कसल्याही प्रकारचा व्हायरस किंवा इतर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव जाणवला नाही.

लागवड केल्यापासून ७० व्या दिवशी माझा प्लॉट तोडणीस आला व मला ३६ गुंठ्यामध्ये एकूण २० टन २०० किलो माल निघाला आणि नं. २ चा ३ टन माल निघाला. ५ रु. १० पैसे प्रति किलो प्रमाणे १,०३,००० रु. आणि नं. २ (बेरास) ३ टन मालाचे ५००० हजार रु. असे एकूण १,०८,००० रु. केवळ ७० दिवसामध्ये ३६ गुंठ्यामधून मिळाले व त्याला खर्च ५०,००० रु. आला व मला खर्च वजा ५८,००० रु. निव्वळ नफा मिळाला. मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे विना मल्चिंग व्यवस्थित प्लॉट येऊन फायदा झाला.