गारपिटीने इतरांच्या कांदा बियाणे प्लॉटचे उत्पादन घटले, आमचे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ३५ गुंठ्यात ३ क्विंटल ६० किलो बिजोत्पादन, १२० दिवसात ९० हजार

श्री. शिवाजी पंडितराव सोळंके,
मु.पो. मोहखेड, ता. धारूर, जि. बीड - ४३११२८.
मो. ९०७५९२१३३१



मला एकूण तीन एकर क्षेत्र आहे. तेव्हा हंगामी बागायती प्रमुख पिके म्हणजे खरीपात कापूस, तूर, सोयाबीन व रब्बी हंगामी गहू, चना इ. पिके घ्यायचो. परंतु नवीन पीक घ्यायचे म्हणून गोट कांदा लागवड करण्याचे ठरवले. एका खाजगी कंपनीने आम्हाला बिजोत्पादन झाल्यानंतर २५००० रु./क्विंटल हमी भावाने कांदा बियाणे घेतो. या करारावर कांदा गोट पुरवले. आमच्या गावामध्ये जवळपास २० शेतकऱ्यांचा एक गट तयार केला व सर्वांना या कंपनीने गोट कांदे बियाणे लागवडीस दिले.

कांदा या पिकाबाबत जास्त काही ज्ञान नव्हते परंतु लागवड करून उगवून वर आल्यानंतर एका दिवशी माझ्या शेतावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. कंपनीचे श्री. सतिश बुरंगे (मो. ८३०८८५१३८८) आले व त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे कांद्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे (जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम, प्रोटेक्टंट - पी, न्युट्राटोन) इ. औषधांच्या ४ फवारण्या केल्या व ड्रीपमधून जर्मिनेटर १ लि. प्रति एकर प्रमाणे दोन वेळेस ड्रीपमधून सोडले. मधल्या काळामध्ये गारपीट झाली व वादळाने पुर्ण पाती पडल्या. परंतु ड्रीपमधून सोडलेल्या जर्मिनेटरमुळे मला तिसऱ्या दिवशी पात उभी राहिलेली दिसली. या कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवला नाही. कांद्याला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फुलोरा अवस्थेमध्ये जाताना परागीभवनाकरिता मधमाश्यांची खुप आवश्यकता असते. तेव्हा मी इतर औषधांसोबत प्रोटेक्टंट- पी ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे निवळी करून फवारणी केल्यामुळे मधमाशांची संख्या वाढली व जास्तीत जास्त फुलांचे (बोडांचे ) परागीभवन होण्यास मदत झाली.

आम्ही २० शेतकऱ्यांनी ह्या गोट कांद्याची लागवड केली होती. मात्र बाकीच्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी औषधे वापरली नव्हती, तर गारपिटीने जे सर्वांचेच नुकसान झाले होते त्यातून त्यांचे प्लॉट पुर्णपणे सावरले नाही. त्यामुळे त्यांना उत्पादनात घट आली. त्यांच्या तुलनेत आम्हाला जवळपास १।। पट उत्पादन (३० - ३५% ) वाढ झाली.

अशा पद्धतीने संगोपन केल्यामुळे मला ३५ गुंठे क्षेत्रामध्ये एकूण ३ क्विंटल ६० किलो बियाणे तयार झाले व प्रति क्विंटल २५,००० रु. हमी भावाने कंपनीने बियाणे खरेदी केले. त्यापासून मला ९०,००० रु. उत्पन्न १२० दिवसामध्ये मिळाले. त्यामुळे मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा आभारी आहे.