२० वर्षपासून १ एकर सिताफळास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर, १८० झाडांपासून ३ लाख २५ हजार

श्री. अमर नंदकुमार कामथे,
मु.पो. शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे.
मो. ९८८१९४४१३२


माझ्याकडे १९९५ एकर सिताफळाची बाग आहे. पुरंदर सिलेक्शन नावाची स्थानिक जात असून भारी जमिनीत १५' x १५' वर लागवड आहे. या सिताफळाला गेली २० वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा सरांच्या मार्गदर्शनानुसार वापर करत असल्याने आम्हाला प्रतिकूल वातावरणात देखील चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत असून फळांचा दर्जा उत्तम असल्याने बाजारभावही इतरांच्या मालापेक्षा अधिक मिळून उत्पन्नात वाढ होते.

जून महिन्यात (२०१६) प्रत्येक झाडास ३ - ३ पाटी शेणखत घालून १५ दिवसांच्या अंतराने पाणी दिले. १ महिन्यानंतर कळी भरपूर लागली. बाहेर फुटीसाठी तसेच कळी गळ होऊ नये म्हणून या दोन्ही अवस्थेत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या २ फवारण्या केल्या. तसेच जर्मिनेटरचे ड्रेंचिंगही केले. त्यामुळे पांढरी मुळी अधिक कार्यक्षम बहाराची फुट जोमाने निघाली. तसेच कळी देखील भरपूर प्रमाणात लागली. कळी लागल्यानांतर केलेल्या फवारणीमुळे गळ न होता फळधारणा चांगल्या प्रकारे झाली. कळीचे प्रमाण खुपच होते, त्यामुळे काही प्रमाणात ती तोडून टाकली. या अवस्थेत ८ - ८ दिवसाला पाणी दिले. तसेच मिलीबग व इतर किडींच्या नियंत्रणासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्यांसोबत काही प्रमाणात किटकनाशक फवारले. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे फळांचे पोषण एवढे झाले की ३ फळांचे वजन केले की ते १ किलोपेक्षा जास्त भरत असे. काही फळे एका किलोत दोनच बसत. या फळांची विक्री आम्ही पुणे मार्केटला श्री. रावसाहेब दिनकर कुंजीर यांच्या गाळ्यावर केली. तेथे आम्हाला १८० रु./किलोपर्यंत उच्चांकी भाव मिळाला. मला १८० झाडांपासून अत्यंत कमी पाऊस असतानाही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे ३ लाख २५ हजार रु. झाले. त्यामुळे डॉ.बावसकर सरांचा मी आभारी आहे. त्यांच्याकडून अनमोल असे मार्गदर्शन मिळाले. चालू वर्षी देखील वापर करणार आहे.