डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे डाळींबास एकसारखी कळी, मधमाश्यांचे प्रमाण अधिक

श्री. अमित पवार, (मे. पवार अॅण्ड सन्स)

राजस्थान थिएटर समोर, मेन रोड, संगमनेर,

जि. अहमदनगर. मोबा. ९८५०१३३००६

श्री. बी. आर. वाध, मु. पो. दोडी, ता. सिन्नर, जि. नाशिक यांची १॥ एकर भगवा डाळींबाची बाग आहे. मार्चमध्ये त्यांना कळी सेटिंग करायची होती. एकसारखी फुले येत नव्हती. यावर आम्ही त्यांना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट, प्रिझम हे फवारण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी फवारणी केली. तर सर्व झाडांना एकसारखी फुले लागली. प्रोटेक्टंटमुळे मधमाश्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे फळधारणा भरपूर झाली. त्याभागात बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटला कळी लागली नाही. ज्यांच्या प्लॉटला कळी लागली ती एकसारखी लागली नाही. त्यांच्या बंधुंच्या बागेतील ४० डी. से. तापमानमुळे लागलेली कळी गळून गेली. त्यामुळे वर्ष वाया (खाली) जाण्याचा मार्गावर आहे. अशा परिस्थितीत बी. आर. वाघ यांच्या प्लॉटवर फळ सेटिंग १००% चांगले झाले आहे.

श्री. राजेंद्र देशमुख, जवळकडलग, ता. संगमनेर हे डाळींब बागेस सुरूवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरतात. त्यामुळे त्यांचा प्लॉट गावात एक नंबरचा आहे. त्यांचे प्लॉट पाहून आता त्यांच्या गावातील शेतकरी आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे घेण्यास आमच्याकडे येतात.

एरवी न उगवणारे जुने कांदा बियाणे जर्मिनेटरमुळे होते उत्तम उगवण

आमच्या भागात पुर्वी कांद्याच्या मोठ्या प्रमाणावर लागवडी होत होत्या. त्यावेळी कांदा बियाणे बहुतांशी शेतकरी घरचे घरी तयार करत, तर काही शेतकरी ज्यांच्याकडे स्वत: चे बी नाही ते इतर शेतकऱ्यांकडून विकत घेत. अशा बियाचा कांदा लागवडीसाठी वापर होत असे. यामध्ये काही शेतकऱ्यांकडे जास्त बिजोत्पादन झाल्याने अथवा कांदा लागवडीच्या हंगामात पाऊसमान कमी झाल्याने बियाणे शिल्लक राहत असे. असे बियाणे २ - ३ वर्षे शिल्लक राहत असे. मात्र ज्यावेळेस लागवडीस अनुकूल वातावरण असताना ते बियाणे लागवडीसाठी वापरले असता त्याची उगवण होत नसे. यामध्ये कित्येक रुपयाचे कांदा बियाणे हे वाया जात असे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत असे. अशावेळी जुने कांदा बियाणे लागवडीच्यावेळी बीजप्रक्रियेस आम्ही त्यांना जर्मिनेटर दिले तर २ - ३ वर्षाचे जुने कांदा बियाणे देखील १०० % उगवत असल्याचे शेतकऱ्यांनी आम्हास कळविले. जर्मिनेटर हे औषध खरोखरच उगवणीसाठी चमत्कारच आहे.

Related New Articles
more...