डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींबावर तेल्याच प्रादुर्भाव नाही

श्री. सुभाष माधवराव यादव,
मु. पो. तावशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.
मोबा. ९८९०७१७०८४शेतकरी बांधवांनो जग आता चंद्रावर राहण्यासाठी चाललय याचा अर्थ जागा कमी पडू लागली आहे. लोकसंख्या वाढत चाललेली आहे. पण उत्पन्नात मात्र कमालीची घट होत चाललेली आहे आणि याचे कारण म्हणजे खराब हवामान, अनियमित पाऊस व जमिनीची सुपिकता कमी होणे ही आहेत. रासायनिक खते, औषधे यांचा भरमसाठ वापर व यांच्या वापरामुळे फळे व अन्नधान्य याच्यात त्याचे औषधांचे विषारी अंश राहिल्यामुळे हृदयविकाराचे झटेक, शरीराला विकलांगपणा येणे अशा, जीवधेणी आजाराला बळी पडावे लागते. तेव्हा शेती आधुनिक पद्धतीने पण सेंद्रिय तत्त्वावर करणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी चा वापर करण्याचे ठरविले. याचा वापर प्रथम किचकट अशा डाळींब या पिकासाठी केला. त्यासाठी मला श्री. अमित यादव कंपनीची प्रतिनिधी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. मी पहिला बहार जानेवारी २०११ रोजी घरला. त्यावेळी छाटणीनंतर प्रत्येक झाडास १ किलोप्रमाणे कल्पतरू सेंद्रिय खत, लिंबोळी पेंड व अर्धा किलो १८ :४६ दिले. पानगळ केल्यानंतर जर्मिनेटर व प्रिझम प्रत्येकी ३०० मिली १०० लि. पाण्यासाठी घेतले. त्यामुळे आमची बाग १०० % संपूर्ण फुटली. त्यानंतर साधारण पोपटी पालवी असताना थ्राईवर + क्रॉंपशाईनर + हार्मोनी + कॅपटॉंप + प्रोटेक्टंट असा फवारा घेतला. त्यामुळे बागेला काळोखी व चकाली आली. पानाला साईज आली. त्यानंतर १० दिवसांनी वरील फवारणीत क्रॉंपशाईनर ऐवजी न्युट्राटोन घेतले, त्यामुळे कळी निघताना टपोरी व मोठी निघाली साधारणत ३५ व्या दिवशी झाडास कळी निघाली व ५० दिवसात सेटिंग झाले १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेत गेलो. हर्मोनीचा आम्हाला तेल्यासाठी एकदम भारी फायदा झाला. आमचा माल तयार झाला (संदर्भांसाठी कव्हरवर फोटो दिला आहे.) तो ५० रू. दराने दिला. २ टन माल निघाला २५ हजार रू. आला. उत्पन्न १ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता ७५ हजार रू. शिल्लक राहिले.

ओगस्टचा भार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी दर रुपये ९० ते १४५/किलो खर्च ३५ हजार - नफा २ लाख

पण एक खंत होती की, बाग पहावयास येणारे लोक म्हणत की, "डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी घ्या, नाहीतर आणखी काय, आता बाग येतेच हो, पण ओगस्टचा बहार धरून दाखवा, मग तुमची टेक्नॉंलॉजी भारी". ही गोष्ट यादव यांना बोललो. ते म्हणाले "लागा तयारीला." आम्ही तयारी केली, छाटणी केली, खते घातली, जुलैमध्ये पानगळ केली, वरीलप्रमाणे फवारण्या केल्या. एवढ्यावर आमचा लगेच धरलेला बहार पण व्यवस्थित आला. तेल्या अजिबात नव्हता. माल पंढरपूर मार्केटला डोंबे अॅण्ड सन्स यांच्याकडे ९० पासून १४५ रू. किलो दराने विकला. जे लोक आम्हाला नावे ठेवत होते, ते लोक आता आमच्या मागे - मागे फिरतात व आम्हाला पण नियोजन सांगा, असे म्हणतात. दुसऱ्या बहाराला आमचे ३५ हजार रू. खर्च वजा जाता २ लाख रू. झाले. म्हणून सांगतो सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही व त्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचाच वापर केला पाहिजे.