मर थांबून झाडे हिरवीगार, बागेत तेल्या नाही, कमी पाण्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया

श्री. अर्जुन विठ्ठल लेंडवे,
मु. पो. मेडसिंगी, ता. सांगोला, जि. सोलापूरम
मोबा. ९८५००२२३९४



शेतकरी बंधुंनो, सगळ काही सोप पण सांगोला तालुक्यात डाळींब आणने व ते पण तेल्या नसलेलं आणि ऑगस्ट बहाराचे ! ही गोष्ट मात्र अशक्य होत चाललीय. पण ते ' डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने' सदन व कमी खर्चात शक्य करून दाखवलय. याचे उदाहरण म्हणजे आमचे स्वत:चे गणेश व भगव्याचे दोन प्लॉट आहेत. आमची शेती मेडसिंगीपासून पुर्वेला, पाण्याची कमतता, त्यात डाळींबाला लागलेला ' मर रोग आणि त्यात तेल्या. त्यावेळी सांगोला तालुक्याचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. अमित यादव यांनी आमच्या प्लॉटला भेट दिली व त्यांनी आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्यास सांगितले. त्यावेळी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पण त्यांनी सांगितले की, प्रथम फक्त मार रोगासाठी आमचे औषध वापरून बघा. त्यावेळी त्यांनी ड्रीपद्वारे ३०० झाडांना २ - २ लिटर जर्मिनेटर व कॉपशाईनर सोडण्यास सांगिलते. मर रोग भरपूर वाढू लागला होता. त्यामुळे तो प्रयोग करण्याचे ठरले व कृषी पंढरी अॅग्रो एजन्सी, पंढरपुरहून औषधे आणली व ती झाडांना दिली. काय चमत्कार, मर जागेवर थांबली व झाडे हिरवीगार झाली! त्यानंतर मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिघी श्री. यादव यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण तंत्रज्ञान वापरले. त्यांनी सुरुवातीला कळी निघण्यासाठी थ्राईवर + क्रॉंपशाईनर + न्युट्राटोन अशी फवारणी घेण्यास सांगितले. थ्रिप्ससाठी प्रोटेक्टंट पावडर २॥ ग्रॅम प्रत्येक लिटरला फावारण्यास सांगितले. अशा फवारण्या १० दिवसाच्या अंतराने केल्या. ३५ व्या दिवशी कळी निघाली. त्यानंतर साहेबांनी तेल्यासाठी हार्मोनी + कॅपटॉंप मारण्यास सांगितले. त्यामुळे बागेवर तेल्या आला नाही. आता साधारणत: ३०० ग्रॅमची फळे आहेत. साधारणत: ७०० ग्रॅम वजनाची फळे होतील.

आम्ही ऑगस्ट बहार धरलेला आहे. सध्या पाण्याची कमतरता आहे. तरीपण तसा परिणाम बागेवर दिसत नाही. याचे कारण आम्ही 'कल्पतरू' वापरले होते. सध्या दर तेजीत असल्यामुळे भरपूर पैसे होतील. असा अंदाज आहे. ही सर्व किमया फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचीच आहे. शेतकरी बांधवांना हे सांगणे की, डाळींब लावायचे असेल तर त्याला फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच वापरा व डाळींबाचे प्रगतीशील बागायतदार व्हा व आपल्या दोन मजली बंगल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ट्रेडमार्क काढा.