२॥ महिन्यात गुलछडी व बिजली चालू केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे

श्री. विठ्ठल ज्ञानोबा चोरगे,
मु. पो. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे.
मोबा. ९८२२१३१२८७


गुलछडीचे कंद २ दिवसात फुटले

माझ्याकडे सोरतापवाडी येथे ८ एकर काळीकसदार जमीन आहे. त्यामध्ये ऊस, गहू, फुलपिके, पालेभाज्या डॉ.बावसकर तंत्रज्ञान वरील पिकांन वापरतो. आजतागायत माझ्याकडे जून २०१० ला लावलेली २० गुंठे गुलछडी आहे. गुलछडीचे कंद लागवड करत असताना १५० मिली जर्मिनेटरचे ५ लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्यामध्ये पुर्ण कंद बुडवून नंतर नितळून घेवून लागवड केली असता २ दिवसांमध्ये कंद फुटले.

त्याचवेळी २० गुंठ्याचे बिजलीच्या बियाणास जर्मिनेटर २५० मिली + १ ग्लास पाणी या द्रावणात हलक्याशा हाताने पेस्ट केली. नंतर सावलीमध्ये वाळवून लागवड केली. या दोन्ही पिकांना अगोदर तागाचे पीक घेऊन २ महिन्याचा झाल्या नंतर जमिनीत गाडला होता आणि ५ ट्रेलर शेणखत फेकून ४ फुटाचे बेड तयार केले. त्याला ठिबक व स्प्रिंक्लरची सोय केली आहे. त्यामुळे ठिबकमधून रासायनिक आणि जैविक खते, औषधे, सोडतो. उष्णतेच्यावेळी व जास्त रोग किंवा मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास स्प्रिंक्लचा वापर करतो. त्यामुळे तापमान कमी होऊन रोग - कीड धुवून जाते. दर १५ दिवसांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी ५०० मिलीची १५० लि. पाण्यातून फवारणी करतो. त्यामुळे २॥ महिन्यामध्ये गुलछडी व बिजली चालू झाली. दोन्ही प्लॉट एकदम चांगले निरोगी असून मालाची विक्री गुलटेकडी फुलबाजारामध्ये चालू आहे. तसेच भेंडी २० गुंठे सप्टेंबर २०११ मध्ये लावलेली आहे. त्यालादेखील तागाचे बेवड करून शेणखत २ ट्रेलर देऊन जमिनीची मशागत केली व ४' x ४' चे बेड तयार केले. याला ठिबकमधून विद्राव्य खतांचा वापर करतो. तसेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५०० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारण्या घेतो. भेंडी एकसारखी चांगली निघत आहे. त्यामुळे १० किलोस २० ते ३० रुपये भाव गुलटेकडी मार्केटला इतरांपेक्षा अधिक मिळत आहे.