आडसाली खोडव्याची उगवण, फुट, वाढ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्तम

श्री. ताजुद्धीन ऐनद्धीन मुजावर,
मु. पो. रुकडी, ता. हातकणगले, जि. कोल्हापूर.
मोबा. ९९६०१८४९८१


मी गेल्या वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर उसासाठी वापरत आहे. आडसाली उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे संपूर्ण पाचट जाळून घेतले. नंतर खोडवा जमिनीलगत छाटून घेतला आणि पाणी दिले. पाणी दिल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कोल्हापूर शाखेचे प्रतिनिधी श्री. केदार मोरे यांच्या सल्ल्यानुसार जर्मिनेटर ७५ मिली + १५ लि. पाणी या पद्धतीने पंपाचा नोझल काढून आळवणी केली. नंतर आठवड्यातच संपूर्ण प्लॉट भरपूर फुटल्याचा दिसून आला. नंतर खोडवा भरणी करतेवेळी रासायनिक खताचे मात्रा दिली व भरणी करून पाणी दिले. त्यानंतर १ -१ महिन्याच्या अंतराने थाईवर, राईपनर प्रत्येकी ५० मिली. आणि प्रोटेक्टंट ५० ग्रॅम/१५ लि. पाणी याप्रमाणे दोन फवारण्या केल्या, तर उसाचे फुटवे जोमाने वाढू लागले. ४ ते ५ महिन्यात ६ ते ७ पेरे सुटल्याचा ऊस तयार झाला आहे. पेऱ्यातील अंतरही मोठे व एकसारखे आहे. उसाच्या वाढीवरून एकरी ७० ते ८० टन उत्पादन सहज मिळेल अशी आशा आहे.

मर रोगाने कोमेजलेला प्लॉट जर्मिनेटरचे आळवणीने सुधारला, सप्तामृताने फुटवा, कळी भरपूर

१० गुंठे क्षेत्रावर वांग्याची लागवड केली होती. मात्र मर रोगाने संपूर्ण प्लॉटमधील जवळपास ४० ते ५० % रोपे कोमेजून गेली होती. झाडांची वाढ खुंटली होती. फुले गळून पडायची यावर श्री. मोरे यांच्या सल्ल्यानुसार जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून प्रत्येक रोपास १०० ते २०० मिली द्रावणाचे आळवणी केले आणि आठ दिवसात सप्तामृताची फवारणी केली. तर वांगी सुधारली. सध्या फुटवा, फुलकळी भरपूर असून फळे लागल्यास सुरुवात झाली आहे.