गारपिटीने गेलेला टोमॅटो प्लॉट, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पुर्ण बहारात

श्री. राजाराम कलाप्पा पाटील,
मु. पो. पिंपळगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर.
मोबा. ९३७१०१२८०६


डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा आम्ही गेली ३ ते ४ वर्षापासून टोमॅटो, भेंडी, कोथिंबीर या पिकांना वापर करत आहे. सप्तामृत औषधांचा या पिकांवर चांगला फरक जाणवतो. ऊस खोडवा फुटण्यासाठी आम्ही नेहमी जर्मिनेटर चा वापर करतो. जानेवारी महिन्यामध्ये २० गुंठे क्षेत्रावरती टोमॅटो पिकाची लागवड केली. रोप लावल्यानंतर जर्मिनेटर ची आळवणी केली. मार्च - एप्रिल महिन्यामध्ये वादळीवारे व गारपिटीचा पाऊस यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. टोमॅटोची रोपे कोमेजून निस्तेज दिसू लागली. आपले प्रतिनिधी श्री. मोरे यांच्या सल्ल्यानुसार टोमॅटोला पाणी देऊन २ दिवसांनी १०० मिली जर्मिनेटर + १५ लि. पाणी याप्रमाणे संपुर्ण पिकाला आळवणी केले व ८ दिवसांच्या अंतराने सप्तामृतच्या फवारण्या करू लागलो. १५ दिवसात प्लॉट पुर्वस्थितीत आला. सध्या फुलकळी मोठ्या प्रमाणात निघाली आहे. ज्या टोमॅटोकडे पहायलाही नको वाटत होते तो प्लॉट सध्या पुर्णपणे बहारात आला आहे. जर्मिनेटर हे पिकाच्या मुळ्यावरती प्रभावीपाने काम करते. त्यामुळे पीक जोमात येते. तसेच सप्तामृत फवारण्यांमुळे उत्पादनात वाढ होते असा आमचा अनुभव आहे.

आम्ही ऑगस्ट बहार धरलेला आहे. सध्या पाण्याची कमतरता आहे. तरीपण तसा परिणाम बागेवर दिसत नाही. याचे कारण आम्ही 'कल्पतरू' वापरले होते. सध्या दर तेजीत असल्यामुळे भरपूर पैसे होतील. असा अंदाज आहे. ही सर्व किमया फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचीच आहे. शेतकरी बांधवांना हे सांगणे की, डाळींब लावायचे असेल तर त्याला फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच वापरा व डाळींबाचे प्रगतीशील बागायतदार व्हा व आपल्या दोन मजली बंगल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ट्रेडमार्क काढा.