१ एकर 'सिद्धीविनायक' शेवग्यापासून पहिल्याच वर्षी ३। लाख रू.

श्री. बाळकृष्ण रघुनाथ पिसाळ, मु.पो. बावधन, ता. वाई, जि. सातारा. मोबा.९२२६१ ४१३९५

२२ जून २०१२ रोजी मोरिंगा शेवगा १ एकरमध्ये लावला आहे. भारीकाळी जमीन असल्याने लागवडीतील अंतर थोडे जादा म्हणजे ९' x ९' ठेऊन लागवड केली. पाणी पाटणे देत आहे. या शेवग्याला सप्तामृताच्या दर महिन्याला याप्रमाणे २ फवारण्या केल्या. त्यानंतर झाडे २॥ ते ३ फुट उंच होती, तेव्हा झाडांचे शेंडे खुडले. नवीन ४ - ५ फुटवे निघाल्यावर पुन्हा एकदा ते फुटवे २ - ३ फुटाचे झाल्यावर खुडले.

सप्तामृत फवारण्या दर महिन्याला चालूच होत्या. कल्पतरू खत लागवडीच्यावेळी आणि पुन्हा २ - २ महिन्याला असे एकूण एकरी ६ बॅगा दिले.

२८ डिसेंबर २०१२ ला शेंगा चालू झाल्या. थंडीचे वातावरण असल्याने सुरुवातीला शेंगा कमी मिळाल्या. मात्र फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यात फुल (भरपूर) माल निघाला. अजून माल चालू आहे. एप्रिल अखेर १२ टन शेंगा मिळाल्या. सर्व शेंगा वाई व स्थानिक मार्केटला विकल्या. तेथे २२ रुपयापासून ६० रू. / किलो भाव मिळाला. या शेवग्यापासून सव्वातीन लाख रू. उत्पन्न मिळाले. मिळालेल्या उत्पन्नात आम्ही पुर्णपणे समाधानी आहोत. मात्र आम्हाला शेवगायची ही पहिलीच वेळ असल्याने ३० - ३२% छाटणी न जमल्याने १०० - १२५ झाडांचे नुसतेच शेंडे वाढले. त्या झाडांना शेंगा फारच कमी लागल्या. नाहीतर अजून ४ - ५ टन उत्पादन निश्चित वाढले असते. तेव्हा आता दुसरा बाहर धरण्यापुर्वी सरांना विनंती आहे की, आपल्या कंपनीचा तज्ञ प्रतिनिधी आमच्याकडे मार्गदर्शनसाठी एकदा पाठवावा. म्हणजे झालेली चूक दुरुस्त होऊन पुढील बहराच्या उत्पादनात अजून वाढ होईल.

Related New Articles
more...