२ एकरात १३१ क्विंटल सोनाका

श्री. उत्तमराव बाबुराव ठाकरे,
मु. पो. पिंपळनारे, ता. चांदवड, जि. नाशिक


माझ्याकडे २ एकर सोनाका द्राक्षबाग आहे. मी आज पर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केलेला नव्हता. पण चालू वर्षीचा माझा अनुभव काही निराळाच आहे. इतर कंपन्यांची अनेक औषधे वापरली पण माझ्या बागेच्या द्राक्षाला कलर, गोडी, चमक येत नव्हती. त्यात माल लुज वाटत होता व फुगवणही कमी होती. त्याच वेळी आमच्या बंधुच्या येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी (श्री. ईश्वर शिंदे) आलेले होते. त्यावेळी त्यांना मी माझ्या प्लॉटमध्ये घेऊन गेलो व माझी व्यथा सांगितली, त्यावेळी त्यांनी मला. क्रॉंपशाईनर, राईपनर,न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे ८ दिवसांनी फवारण्यास सांगितले व मी पिंपळगाव येथील. बी.अे.अॅग्रो एजन्सीजवर जाऊन औषधे आणली व ८ दिवसाच्या अंतराने २ फवारण्य केल्या. परिणामी माझ्या मालाचा लुजपणा तर गेला, कलर गोडी वाढून मालाला वेगळीच चमक येऊन माल चमकू लागला. मालाचा दर्जा सुधारल्यामुळे ३७.५० रू. किलो दर मिळाला व वजनातही वाढ झाली. २ एकरातून १३१ क्विंटल सर्व माल निघाला. हे केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शक्य झाले. आता एप्रिल छाटणीसाठी वेळापत्रकानुसार फवारणीला सुरुवात करत आहे. त्यासाठी जर्मिनेटर सुद्धा घेऊन आलो आहे. चालू वर्षी सर्व द्राक्ष प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करणार आहे. खरच मी ही औषधे वापरल्याने समाधानी आहे. या मिळालेल्या उत्पन्नबद्दल मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे आभार मानतो.