डाळींब कळीसाठी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरूमुळे कमी पाण्यातही अधिक दर्जेदार व मोठ्या आकाराची उत्तम फळे

श्री. निंबा दौलत देवरे,
मु.पो. देऊर (बु.), ता.जि. धुळे.
मोबा. ८६०५३०६१९०


माझ्याकडे शेंदऱ्या (भगवा) डाळींबाची हजार झाडे आहेत. मी चालूवर्षी ७ ऑक्टोबर २०१३ ला पहिले पाणी दिले होते. परंतु १।। ते २ महिने होत आले तरी झाडावर एकही मादी फूल दिसत नव्हते. जे निघत होते त्याचीही गळ होत होती. खर्चही भरपूर झाला होता. मग मला माझ्या गावातील मित्राने डॉ. बावसकर सरांच्या औषधांबद्दल सांगितले व कंपनी प्रतिनिधी श्री. गणेश मांडवडे यांचा मो. नं. ९५७९८१००६६ दिला, त्याप्रमाणे मी त्यांना फोन केला व त्यांनी बागेची परिस्थिती विचारली. नंतर त्यांनी भेट दिली व बागेची पाहणी केली. त्यावरून त्यांनी असे सांगितले की, तुम्ही झाडाचे पाणी वाढवा व मी सांगतो त्याप्रमाणे फवारणी करा, म्हणजे १००% बाग फुटेल व लवकर सेटिंग होईल. प्रत्येक झाडावर १०० ते ११० फळे मोजून देईन असा हमी रिझल्ट काढून देतो असे त्यांनी सांगितले. मग मी त्यांच्या सल्ल्यानुसार साक्रीहून प्रिझम, जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन अशी औषधे आणून फवारणी केली. नंतर १५ दिवसांनी एवढी बाग फुटली की, माझ्या झाडावर गळ न होता १५० ते २०० फळे आज आहेत. नंतर अचानक पाणी कमी झाले. मग त्यांना पुन्हा फोन केला व ते परत बागेची पाहणी करायला आले. त्यांनी विचारले की, आज रोजी प्रती झाडाला किती पाणी मिळते ? तर एक दिवसाआड पाऊण तास पाणी मिळसे असे सांगितले. मग त्यांनी मला प्रती झाडास एक किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यायला सांगितले. या खतामुळे पाणी धरून ठेवले जाईल व जमिनीत जारवा चांगला वाढून फळे पोसली जातील. मी त्याप्रमाणे १ टन कल्पतरू सेंद्रिय खत टाकले.

मला एवढा रिझल्ट मिळाला की, माझ्याकडे एक दिवसाआड आज रोजी फक्त अर्धा तास पाणी मिळते. एवढे कमी पाणी असून देखील माझी बाग टवटवीत व फळांचा आकारही वाढला आहे. सध्या झाडांवर २० ते ३० किलो माल आहे. १५ - २० दिवसात काढणीला येईल. १५० ते ३०० ग्रॅमपर्यंतचे फळाचे वजन आहे. फळांना कलरही चांगला आला आहे. पाणी फारच कमी असूनदेखील समाधानकारक, उत्पादन आल्यामुळे आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर पुर्णपणे समाधानी व खूष आहे.

यावरून पुढच्या वर्षी मी पहिल्या पाण्यापासून डॉ.बावसकर सरांच्या औषधांचा वापर करील व बाग लेट न होता वेळेवर निघेल असे नियोजन करील.